पोलखोल! तब्बल 27 वर्षे शिक्षकाची नोकरी केली, पगारही घेतला; बीएड मार्कशीट बनावट निघाले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 09:32 AM2020-08-20T09:32:16+5:302020-08-20T09:33:58+5:30
उत्तर प्रदेश सरकारने एकच शिक्षिका 1 कोटी पगार घेत असल्याचा घोटाळा उघड झाल्यावर सर्वच शिक्षकांचे कागदपत्र तपासणीचे आदेश दिल्याने हे प्रकरण समोर आले आहे.
लखनऊ: बीएडच्या बोगस मार्कशीटच्या आधारावर एका व्यक्तीने तब्बल 27 वर्षे बिनदिक्कत शिक्षकाची नोकरी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 1998 मध्ये त्याची पोलखोल झाली होती, मात्र प्रबंधकाच्या पाठिंब्यामुळे तो गेली २२ वर्षे नोकरी करत होता. उत्तर प्रदेश सरकारने एकच शिक्षिका 1 कोटी पगार घेत असल्याचा घोटाळा उघड झाल्यावर सर्वच शिक्षकांचे कागदपत्र तपासणीचे आदेश दिल्याने हे प्रकरण समोर आले आहे.
यानंतर शिक्षण विभागाने या शिक्षकाचा पगार थांबवत त्याच्या शाळेतील मुख्याध्यापक, प्रबंधकांना नोटीस पाठविली आहे. प्रतापपूर कमैचा विकास खंड येथील एका ज्युनिअर कॉलेजमध्ये 1993 मध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. त्यावेळी या शिक्षकाने 1993 मधील बीएड उत्तीर्ण असल्याचे संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय वाराणसीचे गुणपत्र दिले होते. जेव्हा सरकारने सर्व शिक्षकांची प्रमाणपत्रे तपासली तेव्हा या शिक्षकाने आदर्श भारतीय माध्यमिक विद्यालय खेतासराय जौनपुरचे बीएड प्रमाणपत्र सादर केले.
यामुळे दोन्ही प्रमाणपत्रे वेगवेगळी पाहून संशय आला. निरिक्षकांनी दोन्ही गुणपत्रांची छाननी केली. विद्यापीठांशी संपर्क साधत सत्यता पडताळण्यात आली. यावेळी नोकरीवेळी जे गुणपत्रक जोडले गेले होते, ते 1998 मध्येच बनावट असल्याचे उघड झाले होते. तसे पत्र संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाने पाठविले. यानंतर जिल्हा निरिक्षक श्याम किशोर तिवारी यांनी कॉलेजच्या संचालकांना आणि मुख्याध्यापकांना नोटीस पाठवून उत्तर मागविले आहे.
डीआयओएस एसके तिवारी यांच्या म्हणण्यानुसार नोटीशीला समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. यामुळे या फसवणुकीला जबाबदार शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर गेल्या 27 वर्षांमध्ये त्याने घेतलेल्या पगाराची वसुलीही केली जाणार आहे. जर संचालक मंडळ किंवा मुख्याध्यापकांनी हे प्रकरण दाबले असले तर त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाईल.
अन्य महत्वाच्या बातम्या...
एकतर्फी प्रेमाने घेतला डॉक्टर तरुणीचा जीव; मंगळावर रात्रीपासून होती गायब
मुकेश अंबानी आता औषधे ऑनलाईन पुरविणार; Amazon ला धोबीपछाड, Netmeds खिशात
Gold Rates Today एका दिवसासाठीच चमकले! सोने पुन्हा घसरले; झटपट जाणून घ्या आजचा दर
जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता
पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
बाबो! झोपलेल्या तरुणाच्या छातीवर येऊन बसली सिंहीण; पहा पुढे काय घडले?
वॉन्टेड! 2000 रुपये पगार पण चिनी कंपन्यांचा होता संचालक; ऐकून वडिलांना बसला धक्का