भ्रष्टाचाराचे ‘प्रदूषण’: प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लाचखोर प्रादेशिक व क्षेत्र अधिकारी जाळ्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 03:20 PM2022-06-29T15:20:38+5:302022-06-29T15:20:47+5:30

Bribe News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले.

'Pollution' of corruption: Corrupt regional and area officials of Pollution Control Board caught! | भ्रष्टाचाराचे ‘प्रदूषण’: प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लाचखोर प्रादेशिक व क्षेत्र अधिकारी जाळ्यात!

भ्रष्टाचाराचे ‘प्रदूषण’: प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लाचखोर प्रादेशिक व क्षेत्र अधिकारी जाळ्यात!

googlenewsNext

नाशिक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संशयित प्रादेशिक अधिकारी प्रवीण मनोहर जोशी (वय५७,रा.औरंगाबाद), क्षेत्र अधिकारी संशयित कुशल मगननाथ औचरमल (वय ४२) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.

अहमदनगर येथक्षल गोल्ड काऊन्सलिंग क्लस्टर या संस्थेच्या हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना सुरु करण्यासाठी संबंधित तक्रारदार उद्योजकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संमतीपत्राकरिता अर्ज व मुळ कागदपत्रे दाखल केली होती. यानंतर औरंगाबाद येथील प्रादेशिक अधिकारी तथा नाशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अतिरिक्त पदभार सांभाळणारे वर्ग एकचे प्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी व नाशिक येथील कार्यालयातील क्षेत्र अधिकारी कुशल औरचमल यांनी तक्रारदाराकडे प्रत्येकी १५ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालय गाठून हकिगत सांगत तक्रार अर्ज दिला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधिक्षक नारायण न्याहाळदे यांनी गंभीर दखल घेत तक्रारीची पडताळणी करत सापळा कारवाईचे आदेश दिले. यानंतर पोलीस उपअधिक्षक सतीश भामरे, पोलीस निरिक्षक अनिल बागुल, किरण अहिरराव, अजय गरूड आदींच्या पथकाने सापळा रचला.

लाचखोर जोशी व औरचमल यांनी तक्रारदाराकडून प्रत्येकी १५ हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच पंचांसमक्ष सातपुरजवळील उद्योग भवनातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात स्वीकारली. यावेळी सापळा कारवाईच्या पथकाने या दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. सातपुर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. यावर्षी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात अद्यापपर्यंत झालेली ही पहिलीच सापळा कारवाई आहे. दोन वर्षांपुर्वी अशाचप्रकारे नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते.

औरंगाबाद येथे मुळ नेमणूक; नाशिकचा अतिरिक्त पदभार
प्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी यांची नेमणूक औरंगाबादच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील सोपविण्यात आला होता. यादरम्यान, संमतीपत्राकरिता दोघा अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे बेकायदेशीरपणे रक्कम अर्जदाराकडून स्वीकारली. यामुळे पुन्हा एकदा प्रदूषण नियंत्रण मंडळातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला.

Web Title: 'Pollution' of corruption: Corrupt regional and area officials of Pollution Control Board caught!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.