पूजा चव्हाण प्रकरणातील अरुण राठोडचे कुटुंब गावाकडे परतलं, पण घरात पाहतात तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 04:57 PM2021-02-15T16:57:23+5:302021-02-15T16:58:20+5:30
Robbery In Arun Rathod's House : परंतु याप्रकरणी सोमवार दुपारपर्यंत फिर्याद दाखल झाली नसल्याने याविषयी सविस्तर माहिती मिळू शकली नाही.
परळी तालुक्यातील दारावती तांडा येथील सुभाष राठोड यांच्या घरी रविवारी रात्री चोरट्यांनी चोरी केली असून त्यात सोन्याचे दागिने आणि रक्कम लांबविली गेली आहे. याप्रकरणी घटनास्थळी परळी ग्रामीण पोलिसांनी भेट दिली आहे. परंतु याप्रकरणी सोमवार दुपारपर्यंत फिर्याद दाखल झाली नसल्याने याविषयी सविस्तर माहिती मिळू शकली नाही.
परळी तालुक्यातील दारावती तांडा येथे सुभाष राठोड यांच्या घरात चोरीची घटना घडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अरुण राठोडचे कुटुंबीय घरी आले तेव्हा घरातील कपाटातील सामान इतस्त: पसलेले होते. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवघरे, पोलीस नाई रामचंद्र केकान, चंद्रकांत आंबाड बीडचे ठसे तज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण त्यांचे कर्मचारी यांनी भेट दिली आहे.सुभाष राठोड हे अरुण राठोड यांचे वडील आहे.
Pooja Chavan Case : आम्हाला बदनाम करू नका, अन्यथा..., पूजा चव्हाणच्या वडिलांचा संताप
पूजा चव्हाणआत्महत्या प्रकरणात अरूण राठोड या तरूणाचं नाव प्रखरतेने समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे, यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपाकडून केला जात आहे, यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपमध्ये अरूण राठोडचा(Arun Rathod) आवाज नाही असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
कोण आहे अरूण राठोड?
अरूण सुभाष राठोड हा वनविभागात नोकरी आहे, तो बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे कुटुंबासह राहत होता, काही दिवसांपूर्वीच अरूण पूजासोबत पुण्यात राहायला गेला होता. ऑडिओ क्लिपमध्ये अरूण राठोडला कथित मंत्र्यांने सूचना दिली होती असं सांगितलं जातं, परंतु हा आवाज संजय राठोड यांचा होता का याबाबत पुष्टी नाहीत, पोलिसांनी या प्रकरणात अरूणची चौकशी सुरू केली आहे, ज्यावेळी पूजा चव्हाणने आत्महत्या केली तेव्हा अरूण राठोड तिथेच उपस्थित होता, आम्हाला फक्त आवाज ऐकायला आला असं अरूणने पोलिसांना सांगितले.