Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; वडील लहू चव्हाण यांची पोलीस ठाण्यात धाव
By प्रविण मरगळे | Published: March 2, 2021 07:00 PM2021-03-02T19:00:24+5:302021-03-02T19:04:09+5:30
Pooja Chavan Suicide Case, Lahu Chavan lodged a complaint against Shantabai Rathod at the police station: शांताबाई राठोड यांच्यासोबत आमचे कुठलेही संबंध नाही, पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी दिलं स्पष्टीकरण
परळी – पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड (Shivsena Sanjay Rathod) यांच्यावर राजीनाम्याची कारवाई झाली, विरोधकांचा वाढता दबाव लक्षात घेता अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) राठोडांचा राजीनामा घेतला, पूजा चव्हाण आत्महत्येनंतर सोशल मीडियात अनेक ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या, यात कथित मंत्र्यांसोबत अरूण राठोड याचा संवाद असून त्यात पूजाच्या आत्महत्येनंतर तिचा मोबाईल ताब्यात घेण्याबाबत मंत्री सूचना करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.(Pooja Chavan Father Lahu Chavan Police Complaint Against Shantabai Rathod)
पूजा चव्हाण आत्महत्येनंतर रविवारी पूजाचे आईवडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली, या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना संशयावरून संजय राठोड यांचा बळी देऊ नका असं म्हटलं होतं, नेमकं यावरूनच पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दुसऱ्याच दिवशी पूजाच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले, पूजाच्या आईवडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये दिल्याचा दावा केला होता, आता या प्रकरणात लहू चव्हाण यांनी परळी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
संजय राठोडांनंतर आणखी एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा? विरोधक सज्ज, सरकार सतर्क
पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी परळी पोलीस ठाण्यात शांताबाई राठोड यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. शांताबाई राठोड यांनी आमच्या कुटुंबीयांवर केलेले आरोप निराधार असून आमची बदनामी करणारे आहेत, त्यामुळे शांताबाई राठोड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा अशी तक्रार लहू चव्हाण यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे, त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.
पूजा चव्हाणचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर
पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाच्या अहवालात तिच्या मणक्याला आणि डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यू झाल्याचे कारण समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर मात्र पोलिसांकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे, त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच याविषयीची अधिक माहिती दिली जाईल असे या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रकरण दाबण्यासाठी दिलेत ५ कोटी रुपये
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार नाही, तोवर लढा सुरू ठेवला जाणार आहे. सर्वसामान्य व्यक्तीवर लगेच गुन्हा दाखल केला जातो; मात्र, मंत्र्यांवर गुन्हा दाखल होत नाही, हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दिली तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले, असा दावा त्यांनी केला होता.