Porn case : राज कुंद्रानं अटक टाळण्यासाठी मुंबई क्राइम ब्रांचला दिले होते 25 लाख, आरोपीचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 03:43 PM2021-07-22T15:43:34+5:302021-07-22T15:45:52+5:30

माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, पॉर्न फिल्म्स प्रकरणात अरविंद श्रीवास्‍तव उर्फ यश ठाकूर हाही आरोपी आहे. त्याने ईमेलच्या माध्यमाने मार्च महिन्यात अँटी करप्‍शन ब्‍यूरोकडे (ACB) यासंदर्भात तक्रारही केली होती.

Porn case Accused alleged, Raj kundra gave 25 lakh rupee bribe to mumbai crime branch to evade arrest  | Porn case : राज कुंद्रानं अटक टाळण्यासाठी मुंबई क्राइम ब्रांचला दिले होते 25 लाख, आरोपीचा खळबळजनक खुलासा

Porn case : राज कुंद्रानं अटक टाळण्यासाठी मुंबई क्राइम ब्रांचला दिले होते 25 लाख, आरोपीचा खळबळजनक खुलासा

Next

मुंबई - बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीचा पती बिझनेसमन राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अ‍ॅपच्या सहाय्याने रिलीज करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आता राज कुंद्रासंदर्भात एका आरोपीने मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात वांटेड असलेल्या एका आरोपीने, राज कुंद्राने अटक टाळण्यासाठी मुंबई पोलीसांच्या क्राइम ब्रांचला (Mumbai Crime Branch) 25 लाख रुपयांची लाच दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे. (Porn case Accused alleged, Raj kundra gave 25 lakh rupee bribe to mumbai crime branch to evade arrest)

माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, पॉर्न फिल्म्स प्रकरणात अरविंद श्रीवास्‍तव उर्फ यश ठाकूर हाही आरोपी आहे. त्याने ईमेलच्या माध्यमाने मार्च महिन्यात अँटी करप्‍शन ब्‍यूरोकडे (ACB) यासंदर्भात तक्रारही केली होती. तेव्हा एसीबीने ही तक्रार मुंबई पोलीस कमिश्‍नर ऑफिसला एप्रिलमध्ये पाठवली होती. मात्र, शहरातील पोलीस अधिकारी यावर काहीही बोलत नाहीत. क्राइम ब्रांचने बुधवारी राज कुंद्राच्या अंधेरीतील कार्यालयावरही छापा टाकला होता. 

व्वा...! काय प्लॅन आहे...! त्यांना पॉर्न इंडस्ट्रीचा 'राजा' व्हायचं होतं! राज, शिल्पावर KRKचा निशाणा

अरविंद श्रीवास्‍तवची फ्लिज मूव्हीज नावाची फर्म होती. यापूर्वी तिचे नाव न्‍यूफ्लिक्‍स होते. या फर्मचा संबंध अमेरिकेशी आहे. या फर्मकडून मार्च महिन्यात तक्रार करण्यात आली होती. मार्च महिन्यात पोलिसांनी फर्मचे नावही नोंदवले होते आणि हिचे मालक अरविंद श्रीवास्‍तवचे दोन बँक अकाउंट सीझ केले होते. या अकाउंट्सवर 4.5 कोटी रुपये होते. ईमेलमध्ये न्‍यूफ्लिक्‍सने दावा केला आहे, की पोलिसांच्या एका खबऱ्याने फर्मकडे 25 लाख रुपयांचीही मागणी केली होती.

मुंबई पोलीसच्या क्राइम ब्रांचला मोठे यश मिळाले आहे. आरोपी उमेश कामतने तयार केलेले 70 व्हिडिओ क्राइम ब्रांचच्या हाती लागल्याचेही बोलले जात आहे. सांगण्यात येते, की हे सर्व व्हिडिओज कामतने वेग-वेगळ्या प्रोडक्‍शन हाऊसच्या मदतीने तयार केले होते.

डायमंड रिंगपासून ते बुर्ज खलीफात फ्लॅटपर्यंत, राज कुंद्रानं शिल्पाला दिले आहेत हे अत्यंत महागडे गिफ्ट्स

याशिवाय हॉट शॉट appवर अपलोड केलेल्या २० मिनिटांपासून ३० मिनिटांपर्यंतचे एकूण ९० व्हिडिओदेखील गुन्हे शाखेने जप्त आहेत. आज झालेल्या चौकशी दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने उमेश कामत याने यूके स्थित प्रॉडक्शन कंपनी केनरीनला पाठवलेल्या व्हिडिओबाबत राज कुंद्राने दुजोरा दिला आहे. तथापि, चौकशी दरम्यान राज कुंद्रा सातत्याने असा दावा करीत आहे की, तो अश्लील व्हिडिओ नव्हे तर इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या इतर इरॉटिक व्हिडिओंप्रमाणे व्हिडिओ बनवत असे.


 

Web Title: Porn case Accused alleged, Raj kundra gave 25 lakh rupee bribe to mumbai crime branch to evade arrest 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.