पतंजलीच्या ऑनलाईन बैठकीत पुण्यातून कांड, अचानक सुरू झाला पॉर्न Video

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 09:29 AM2022-12-22T09:29:28+5:302022-12-22T10:42:49+5:30

पतंजली योगपीठशी संबंधित आरोग्य संशोधन केंद्रात एक ऑनलाईन बैठक सुरू होती. बैठकीला देश-विदेशातील अनेक जण उपस्थित होते.

Porn started from Pune in Pantajli's online meeting, there was chaos, Fir lodged in haridwar | पतंजलीच्या ऑनलाईन बैठकीत पुण्यातून कांड, अचानक सुरू झाला पॉर्न Video

पतंजलीच्या ऑनलाईन बैठकीत पुण्यातून कांड, अचानक सुरू झाला पॉर्न Video

googlenewsNext

पुणे - ऑनलाईन मिटींग, झुमवरील बैठकांमध्ये अनेकदा काही मजेशीर आणि हास्यास्पद घटना घडतात. ऑनलाईन बैठकांसाठी अप टू डेट अशा प्रकारात सर्वचजण असतील असे नाही, त्यामुळेच या घटना यापूर्वीही घडल्याचं आपण पाहिलं आहे. आता, बाबा रामदेव यांच्या पतंजली ब्रँडशी संबंधित अधिकारी वर्गाची बैठक होती, या बैठकीत अचानक उपस्थित एका व्यक्तीकडून पॉर्न व्हिडिओचं स्ट्रीमिंग करण्यात आलं. त्यानंतर, या झुम मिटींगमध्ये एकच गोंधळ उडाला. या बैठकीत काही महिलाही सहभागी होत्या. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पतंजली योगपीठशी संबंधित आरोग्य संशोधन केंद्रात एक ऑनलाईन बैठक सुरू होती. बैठकीला देश-विदेशातील अनेक जण उपस्थित होते. तेव्हा पुण्यातून मीटिंगमध्ये सहभागी झालेल्या एका तरुणानं पॉर्न व्हिडीओ सुरू केला. तरुणानं हा प्रकार जाणूनबुजून केला की त्याच्या हातून चुकून घडला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, मीटिंगमध्ये पॉर्न व्हिडीओ सुरू झाल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी हरिद्वारच्या बहादराबाद येथील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर, पोलिसांनी माहिती व तंत्रत्रान कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला आहे. पुण्यातील येरवडास्थित कॉलेज कॅम्पसजवळ राहणाऱ्या आकाश नामक व्यक्तीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, पतंजलीशी संबंधित कमल भदौरिया आणि शिवम वालिया यांनी तक्रार नोंदवली. पतंजलीकडून एक तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती एसएसपी अजय सिंह यांनी दिली.

नेपाळमध्ये पतंजलीच्या दिव्या फार्मसीची उत्पादने बॅन

पतंजलीची सर्व उत्पादने बनवणाऱ्या बाबा रामदेव यांच्या दिव्या फार्मसीला एक मोठा धक्का बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच World Health Organistion (WHO) मानकांची पूर्तता न केल्यामुळे नेपाळ या देशाने दिव्या फार्मसीला (Divya Pharmacy) काळ्या यादीत (Black List) टाकले आहे. हे कठोर पाऊल केवळ दिव्या फार्मसीच्या बाबतीच नव्हे तर १६ भारतीय औषध कंपन्यांविरुद्ध उचलण्यात आले आहे. नेपाळच्या औषध नियामक प्राधिकरणाच्या या निर्णयानंतर देशातील पतंजली उत्पादनांच्या निर्मितीवर मोठे संकट निर्माण झाले आहे. विभागाने जारी केलेल्या नोटीशीनुसार, सूचीबद्ध कंपन्यांनी उत्पादित केलेली औषधे नेपाळमध्ये आयात किंवा वितरित केली जाऊ शकत नाहीत.

Web Title: Porn started from Pune in Pantajli's online meeting, there was chaos, Fir lodged in haridwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.