वेबसीरिजच्या नावाखाली पॉर्न; महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 06:38 AM2022-12-06T06:38:22+5:302022-12-06T06:38:36+5:30

चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे यास्मीन खान, अनिरुद्ध प्रसाद जांगड, अमित पासवान आणि आदित्य अशी आहेत.

Porn under the name of webseries! A case has been registered against four including the woman, one has been arrested | वेबसीरिजच्या नावाखाली पॉर्न; महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक

वेबसीरिजच्या नावाखाली पॉर्न; महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक

Next

मुंबई : मॉडेलची पॉर्न फिल्म बनवत इंटरनेटवर अपलोड केल्याप्रकरणी एका महिलेसह चार जणांवर चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परदेशी ग्राहकांसाठी असलेल्या वेबसीरिजसाठी बोल्ड सीन करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची तक्रार तिने केल्यानंतर ही कारवाई करत एकाला अटक करण्यात आली. 

चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे यास्मीन खान, अनिरुद्ध प्रसाद जांगड, अमित पासवान आणि आदित्य अशी आहेत. जांगड हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, इतर फरार आहेत. तक्रारदार महिलेने काम मिळण्याच्या आशेने तिचा मोबाइल नंबर, फोटो व कामाची माहिती इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर केली होती. मॉडेलने सांगितले की, राहुल ठाकूर याने सप्टेंबरमध्ये पहिल्यांदा संपर्क साधला. तिला राहुल पांडेकडे पाठवण्यात आले. पांडेने मॉडेलला सांगितले की, त्यांना त्यांच्या वेबसिरीजसाठी ‘मोबाइल ॲप’ नावाच्या ॲप्लिकेशनसाठी अभिनेत्रीची गरज आहे; परंतु त्या व्यक्तीने ‘बोल्ड सिन्स’ करणे आवश्यक आहे. मात्र, ही वेबसीरिज भारतात प्रदर्शित होणार असल्याचे समजल्यानंतर ऑफर नाकारल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. पांडेने ऑक्टोबरमध्ये मॉडेलकडे पुन्हा प्रस्ताव देत ॲपवर परदेशी क्लायंटसाठी वेबसिरीज रिलीज केली जाईल, असे सांगितले. 

पांडेच्या विनंतीनुसार, ती ८ ऑक्टोबर रोजी मालाड स्टेशनवर जांगडला भेटली. एका उंच इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये नेण्यात आले. फ्लॅटच्या आत, तक्रारदाराला यास्मीन आणि मेकअप आर्टिस्ट तसेच दोन पुरुष भेटले. यास्मीन सीन शूट करत होती आणि तिने मॉडेलला नग्न व्हायला सांगितले. मॉडेलने नकार दिल्यावर यास्मीनने तिला धमकी दिली.

पॉर्न साइटवर व्हिडीओ
२६ नोव्हेंबरला तिचा व्हिडीओ पॉर्न साइटवर आल्याचे समजल्याने तिने यास्मीनला जाब विचारत तो हटवण्यास सांगितले आणि २९ नोव्हेंबर रोजी चारकोप पोलिसांत तक्रार केली.

Web Title: Porn under the name of webseries! A case has been registered against four including the woman, one has been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.