पॉर्न पाहणाऱे संकटात; पॉप्युलर वेबसाईटचा डेटा लीक झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 09:06 AM2021-01-25T09:06:40+5:302021-01-25T09:07:23+5:30

Porn website Data leak : डेटा लीक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पॉर्न वेबसाईटने सांगितले की, युजरना सूचना देण्यात आली असून त्यांचे पासवर्डही रिसेट केले आहेत. ही वेबसाईट पॉप्युलर अॅडल्ट वेबसाईटच्या यादीत २७ व्या नंबरवर आहे.

Porn viewers in trouble; Popular website data leaked by hackers | पॉर्न पाहणाऱे संकटात; पॉप्युलर वेबसाईटचा डेटा लीक झाला

पॉर्न पाहणाऱे संकटात; पॉप्युलर वेबसाईटचा डेटा लीक झाला

googlenewsNext

नवी दिल्ली : एका पॉप्युलर पॉर्न वेबसाईटच्या युजर्सचा डेटा लीक झाला आहे. यामध्ये युजरचे नाव आणि ईमेल सारखी खासगी माहिती आहे. रिपोर्ट नुसार हॅकर या माहितीचा गैरवापर करू शकणार असानू सायबर हल्ले किंवा युजरला ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी करू शकतात. 


Cyber News ने दिलेल्या वृत्तानुसार, MyFreeCams नावाच्या एका पॉर्न वेबसाईटचा डेटा लीक झाला आहे. लीक डेटामध्ये जवळपास 20 लाख युजरची माहिती आहे. यामध्ये युजरचा ईमेलआडी, आयपी अॅड्रेस, त्यांनी केलेले सर्च, युजरनेम आणि पासवर्ड सारखी खासगी माहिती आहे. आता ही माहिती ब्लॅक मार्केटमध्ये विकली जात आहे. 


यावर हे हॅकर माहितीच्या बदल्यात बिटकॉईनची मागणी करत आहेत. हा डेटाबेस युजरच्या एका प्रसिद्ध फोरमवर विकला जात आहे. 10000 युजरसाठी 1500 डॉलरचे बिटकॉईन मागितले जात आहेत. त्यांचा असा दावा आहे की या 10 हजार युजरचा डेटा खरेदी करून कमीत कमी 10 हजार डॉलर कमावले जाऊ शकतात. 


डेटा लीक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पॉर्न वेबसाईटने सांगितले की, युजरना सूचना देण्यात आली असून त्यांचे पासवर्डही रिसेट केले आहेत. ही वेबसाईट पॉप्युलर अॅडल्ट वेबसाईटच्या यादीत २७ व्या नंबरवर आहे. या वेबसाईटचे महिना 7 कोटी व्हिजिटर आहेत. 
महत्वाचे म्हणजे, हॅकर कोणत्याही प्रकारे या माहितीचा वापर करू शकतात. युजरला ब्लॅकमेल केले जाणारे ईमेल येऊ शकतात. ही माहिती मित्र, कुटुंबीय, समाजात व्हायरल केली जाण्याची शक्यता आहे. अशी धमकी ते देऊ शकतात. तसेच ईमेल आयडी फिशिंग किंवा स्पॅमसाठीही वापरला जाऊ शकतो. 


...म्हणून पॉर्नहबने वेबसाईटवरून हटवले लाखो व्हिडीओ
अश्लील चित्रपट जगतातील कुख्यात पॉर्न वेबसाईट असलेल्या पॉर्नहबने आपल्या साइटवरून लाखो अश्लील व्हिडीओ हटवले आहेत. अशा युझर्सचे व्हिडिओ हटवण्यात आले आहेत जे या साइटवर व्हेरिफाइड नव्हते. theguardian.com ने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी कॅनडामधील या अ‍ॅडल्ट साइटवरील व्हिडिओंची संख्या घटून १३० लाखांवरून ४० लाखांपर्यंत आली होती. अल्पवयीन आणि सेक्स ट्रॅफिकिंगची शिकार झालेल्या मुलींचे व्हिडीओ साइटवरून हटवण्यात पॉर्नहबला अपयश आले असल्याचा आरोप या साइटवर झाला होता. त्यापूर्वी या संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह आणि अवैध व्हिडिओ असल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर व्हिसा आणि मास्टरकार्ड या क्रेडिट कार्ड कंपन्यांनी पॉर्नहबला पेमेंट प्रोसेस करणार नसल्याचे जाहीर केले होते. हा पॉर्नहबसाठी मोठा धक्का होता.

Read in English

Web Title: Porn viewers in trouble; Popular website data leaked by hackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.