व्हॉट्स अॅपवर रिसेप्शनिस्टला अश्लिल व्हिडीओ पाठविला; पोलिसांनी थेट तुरुंगात धाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 09:01 PM2019-11-15T21:01:39+5:302019-11-15T22:01:11+5:30
गुन्हे शाखेच्या कक्ष - २ ने तांत्रिक मदत घेऊन १९ वर्षीय तरुणास कामाठीपुरा येथून अटक करण्यात आली.
मुंबई - व्हॉट्स अॅपवर महिलेस अश्लील व्हिडीओ पाठवून शिवीगाळ करणाऱ्यास गुन्हे शाखा कक्ष - २ ने बेड्या ठोकल्या आहेत. १३ नोव्हेंबरला डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५४ (अ), ५०४, ५०६ आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ (अ) अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष - २ ने तांत्रिक मदत घेऊन १९ वर्षीय तरुणास कामाठीपुरा येथून अटक करण्यात आली.
तक्रारदार गिरगाव परिसरात एका डॉक्टरकडे ३७ वर्षीय महिला रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. १३ नोव्हेंबरला सायंकाळी तिच्या मोबाईलमधील व्हॉट्स अॅपवर एका अज्ञात मोबाइलधारकाने त्याच्या मोबाईलवरून अश्लील व्हिडीओ पाठविला. म्हणून तक्रारदार महिलेने अज्ञात इसमास कोण आहे ? अशी विचारणा केली असता त्याने तिला घाणेरड्या शिव्या लिहून पाठविल्या. त्यानंतर महिलेने याबाबत डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
गुन्हे शाखा कक्ष - २ ने गुन्ह्याचा तांत्रिक मदत घेऊन तपास सुरु केला. तपासादरम्यान १४ नोव्हेंबरला १९ वर्षीय तरुणास कामाठीपुरा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या ओपो कंपनीचा मोबाईल फोनची तपासणी केली असता त्या मोबाईल फोनमध्ये त्याने त्याचे व्हॉट्स अॅपवरून तक्रारदार यांना अश्लील व्हिडीओ आणि मेसेज पाठविल्याचे आढळून आले. अधिक चौकशीत तो कामाठीपुरा परिसरातील मेडिकल दुकानात डिलिव्हरी बोटीचे काम करत असून यातील तक्रारदार या देखील एका डॉक्टरकडे काम करत असल्याने त्यांचा एकाच व्हॉट्स अॅप ग्रुप आहे. या व्हॉट्स अॅप ग्रुपमधून आरोपीने तक्रारदार महिलेचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून आरोपीने स्वतःचे अश्लील व्हिडीओ पाठविले होते. तक्रारदार महिलेने विचारणा केली असता त्याने अश्लील शिवीगाळ मेसेजद्वारे केली. अटक आरोपीला पुढील कारवाईसाठी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.