Pornography Case : राज कुंद्राची अडचण वाढली! 4 कर्मचारी होणार सरकारचे साक्षीदार; क्राइम ब्रांचला सांगितले रॅकेटचे सर्व 'राज'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 05:11 PM2021-07-25T17:11:37+5:302021-07-25T17:12:29+5:30
क्राइम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठसह इतर तीन लोकांना आज चौकशीसाठी बोलावले आहे. पण...
Raj Kundra Pornography Case : पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राचे चार कर्मचारी सरकारी साक्षीदार होणार आहेत. या कर्मचाऱ्यांनी मुंबई क्राइम ब्रांचला अश्लील फिल्म रॅकेटसंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे.
यासंदर्भात, क्राइम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठसह इतर तीन लोकांना आज चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, आपण सध्या मुंबई बाहेर असल्याचे गहना वशिष्ठने सांगितले आहे. यामुळे ती हजर होऊ शकणार नाही. तसेच, या प्रकरणाच्या तपासात आपण पूर्णपणे मदत करण्यास तयार आहोत, असेही तिने म्हटले आहे.
शिल्पा शेट्टीला 120 टक्के माहित असणार...! मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले
शिल्पा शेट्टी माझा काहीही संबंध नाही -
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, हॉटशॉट ॲपशी माझा काहीही संबंध नाही. माझा पती राज कुंद्रा याचा अश्लील चित्रपट बनविण्याशी काहीही संबंध नाही. माझा मेव्हणा प्रदीप बक्षी हा हॉट शॉट ॲपचा सर्व कारभार पाहतो. हॉटशॉट ॲपचे २० लाख ग्राहक आहेत. मढ समुद्रकिनाऱ्यावरील एका बंगल्यात फेब्रुवारी २०२१मध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकून अश्लील चित्रपट आणि वेबसिरिज बनविणाऱ्यांना अटक केली होती. याच प्रकरणात राज कुंद्रा यांनाही अटक करण्यात आली.
शिल्पा शेट्टीने एका निवेदनात म्हटले आहे की, माझा पती राज कुंद्रा हा निरपराध आहे. हॉटशॉट या ॲपवर झळकलेले चित्रपट कामुक आहेत पण अश्लील नाहीत असा दावा शिल्पा शेट्टी हिने एका निवेदनात केला होता.
राज कुंद्राच्या चाहत्यांकडून मिळाली बलात्कार, ठार मारण्याची धमकी; मॉडेलचा आरोप
राज कुंद्राला कथित पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचने अटक केली आहे. न्यायालयाने राजचे आयटी प्रमूख रयान थ्रोपसह त्याची पोलीस कोठडी 27 जुलैपर्यंत वाढवली आहे.