Pornography Case: क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी शिल्पा शेट्टीला विचारला थेट प्रश्न; मिळालं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 09:11 AM2021-07-24T09:11:19+5:302021-07-24T09:12:02+5:30
प्रोपर्टी सेलच्या दोन अधिकाऱ्यांनी शिल्पाला 20 ते 25 प्रश्न विचारले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पाला हॉटशॉटसंदर्भात माहिती असल्याची माहिती क्राइम ब्रांचला मिळाली होती.
मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला बिझनेसमन राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला क्राइम ब्रांचने काही प्रश्न केले आहेत. न्यायालयाने राज कुंद्राला पोलीस कोठडीत पाठवताच क्राइम ब्रांच त्याला शुक्रवारी त्याच्या घरी घेऊन गेली. तेथे त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीही होती.
शिल्पा शेट्टीची चौकशी -
शिल्पाच्या घरातील झाडाझडतीत क्राइम ब्रांचने काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. यानंतर प्रोपर्टी सेलच्या दोन अधिकाऱ्यांनी शिल्पाला 20 ते 25 प्रश्न विचारले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पाला हॉटशॉटसंदर्भात माहिती असल्याची माहिती क्राइम ब्रांचला मिळाली होती.
Shilpa Shetty : पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पहिली रिअॅक्शन, झालीय अशी स्थिती
क्राइम ब्रांचने शिल्पाला कोणते प्रश्न विचारले आणि शिल्पाने काय दिली उत्तर? -
शिल्पाला पॉर्न रॅकेटसंदर्भात माहिती होती?
पोलिसांनी विचारले, की आपल्याला राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटसंदर्भात माहिती होती? या रॅकेटपासून मिळणारे पैसे वियान इंडस्ट्रीत जात होते. ज्यात ती स्वतः 2020 पर्यंत डिटेक्टर होती? यावर शिल्पा म्हणाली, जे व्हिडिओ हॉटशॉटवर आहेत. ते पॉर्न नाहीत, तर एरोटीक आहेत. एवढेच नाही, तर असा कंटेंट तर दुसऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आहे. यांपैकी अनेक अधिक प्रमाणावर ओबसीनही असतात, असेही शिल्पा म्हणाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राप्रमाणेच शिल्पानेही पोलिसांना माहिती दिली, की ज्या व्हिडिओंना क्राइम ब्रांच पॉर्न म्हणत आहे, ते त्यार करण्यात तिचा कसल्याही प्रकारचा हात नाही.
बँक खात्यांचीही होणार तपासणी
पोर्नोग्राफीतील पैसे शिल्पा शेट्टी यांच्याही बँक खात्यात गेले आहेत का, हे शोधण्यासाठी त्यांची बँक खाती तपासण्यात येणार आहेत. तसेच कुंद्रा यांच्यासोबत कुठल्या कंपनीत त्यांची भागीदारी आहे का, याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.
तसेच, या प्रकरणाशी शिल्पाचा थेट संबंध जोडता येईल, असा कोणताही पुरावा आपल्याला मिळालेला नाही, असे मुंबई पुलिसांनी म्हटले आहे.