कबरीतून मृतदेह बाहेर काढून महिलेचे केलं पोस्टमॉर्टम, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 04:44 PM2022-05-02T16:44:14+5:302022-05-02T16:46:40+5:30
UP Crime News : महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सासरच्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत तिचा मृतदेह पुरला होता. संशय आल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील भगतपूर गावात रविवारी 3 महिन्यांनंतर एका महिलेचा मृतदेह कबरीतून (Grave) बाहेर काढण्यात आला. त्याबाबत आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी (Post mortem) पाठवला आहे. या महिलेचा ३ महिन्यांपूर्वी संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाला होता. महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सासरच्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत तिचा मृतदेह पुरला होता. संशय आल्याने वरिष्ठ पोलिस (police) अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
उत्तराखंडमधील बरखेडा गावात राहणाऱ्या महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले की, तिने आपल्या मुलीचे लग्न भगतपूर गावात राहणाऱ्या तरुणाशी केले होते. लग्नानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. आजपासून 3 महिन्यांपूर्वी मुलीच्या सासरच्यांनी फोन करून सांगितले की, तुमची मुलगी मरण पावली, त्यावर सर्व कुटुंबीय भगतपूर गावात पोहोचले, त्यांनी पाहिले की, महिलेला येण्यापूर्वीच पुरण्यात आले आहे. याचा संशय सासरच्या मंडळींना आला. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली.
४० पोलीस घरात घुसले, बहीण आवाज देत राहिली'; वाचवा, कुणाला तरी फोन करा...
त्याचवेळी भगतपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी लखपत सिंह यांनी सांगितले की, नातेवाईकांच्या तक्रारीवरून महिलेचा मृतदेह स्मशानभूमीतून काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पुरावे गोळा करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. दुसरीकडे, एसपी देहत विधा सागर मिश्रा म्हणाले, 'भगतपूर पोलीस स्टेशन परिसरात एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. त्यावेळी घरच्यांनी कोणतीही तक्रार दिली नव्हती. नंतर हुंड्यामुळे त्यांच्या मुलीची हत्या केल्याचे सांगण्यात आले. या अंतर्गत भगतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी ते म्हणाले, 'महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे होते, त्यामुळे रविवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मृतदेह कबरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, कारण यापूर्वी गुन्हा दाखल झाला नव्हता. आता महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाच्या क्रमाने शवविच्छेदन आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मृतदेहाचा पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले आहे.