जीवाला धोका असल्यानं प्रभाकर साईला पोलीस संरक्षण, मुंबई पोलिसांकडे केली होती मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 08:06 PM2021-10-25T20:06:06+5:302021-10-25T20:10:05+5:30
Police Protectiom to Prabhakar sail : साईल याच्याकडून सविस्तर माहिती घेऊन कायदेशीर कारवाईबाबत मुंबई पोलिसांचा विचार असल्याची माहिती समजत आहे.
मुंबई - समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करणारे साक्षीदार, पंच प्रभाकर साईल मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आज दुपारी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी जीवाला धोका असल्यानं पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साईल यांच्या मागणीनुसार त्यांना पोलीस संरक्षण दिल्याचं सांगितलं आहे.
मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईलने रविवारी एक व्हिडिओ जाहीर करत २५ कोटींच्या तोडपाणीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कोऱ्या कागदावर पंच म्हणून स्वाक्षरी घेतल्या. त्याचप्रमाणे या प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी कारण्याबाबतचं संभाषण ऐकल्याचा दावाही साईल यांनी केला होता. त्यामुळे जीवाला धोका असल्याने आज प्रभाकर साईल मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झाले होते.
Drugs-on-cruise-case, Mumbai | Prabhakar Sail, witness in the case reaches Crime Branch office. pic.twitter.com/jnwCHqCRJF
— ANI (@ANI) October 25, 2021
तसेच त्याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. साईल याच्याकडून सविस्तर माहिती घेऊन कायदेशीर कारवाईबाबत मुंबई पोलिसांचा विचार असल्याची माहिती समजत आहे.
Drugs-on-cruise-case | Police protection has been provided to him (Prabhakar Sail, a witness who has alleged payoff in the case) as demanded by him: Maharashtra Home Minister Dilip Walse Patil pic.twitter.com/0x5GEigXTS
— ANI (@ANI) October 25, 2021