''या'' गोष्टीसाठी जुगारात पत्नीचा डाव खेळला; हरल्यानंतर पतीने जिंकणाऱ्याकडे सोपविले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 12:02 PM2019-08-21T12:02:07+5:302019-08-21T12:02:51+5:30

पतीच्या या कृत्यामुळे या महिलेने आधुनिक द्रौपदीचे रूप घेत गोंधळ घातला आणि तिथून कशीबशी सुटका करून घेत माहेर गाठले.

prayagraj man lost his wife's in gambling for motorcycle | ''या'' गोष्टीसाठी जुगारात पत्नीचा डाव खेळला; हरल्यानंतर पतीने जिंकणाऱ्याकडे सोपविले

''या'' गोष्टीसाठी जुगारात पत्नीचा डाव खेळला; हरल्यानंतर पतीने जिंकणाऱ्याकडे सोपविले

Next

प्रयागराज : महाभारतात धर्मराज युधिष्ठिराने कौरवांसोबतच्या द्युतामध्ये पत्नी द्रौपदीला डावावर लावले होते. मात्र, हरल्याने नंतरच्या घडामोडी तुम्हाला माहिती असतीलच. पण कलियुगातही अशा गोष्टी घडत आहेत. एका मोटारसायकलसाठी जुगारात पत्नीला डावावर लावून हरल्यानंतर जिंकणाऱ्याकडे पत्नीला सोपविल्याचा प्रकार घडला आहे. 


पतीच्या या कृत्यामुळे या महिलेने आधुनिक द्रौपदीचे रूप घेत गोंधळ घातला आणि तिथून कशीबशी सुटका करून घेत माहेर गाठले. नंतर माहेरून मोटारसायकल देण्याच्या आश्वासनानंतर पतीने या महिलेला घरी ठेवले खरे पण बाईक न मिळाल्याने पतीने तिला पुन्हा घराबाहेर काढले आहे. 


उत्तर प्रदेशच्या कंधरापूर गावातील ही घटना आहे. शंकरपूरमधील प्रकाश यांच्या मुलीचा विवाह कंधरापूरच्या विपिनसोबत दोन वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, हुंड्यामध्ये बाईक न मिळाल्याने विपिन नाराज होता. बाईकची इच्छा पूर्ण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी त्याने पत्नीलाच जुगाराच्या डावावर लावली. मात्र, हरल्यानंतर त्याने पत्नीला जिंकलेल्या व्यक्तीसोबत जाण्यास सांगितले. 


धक्कादायक म्हणजे हा व्यक्ती या महिलेला जबरदस्ती करत स्वत:सोबत घेऊन जात होता. यावेळी महिलेने गोंधळ घातल्याने त्याने हात सोडला. यानंतर ही महिला माहेरी आली. यानंतर तिच्या वडीलांनी मुलीला नांदविण्याची गळ घातली. तसेच बाईक देण्याचे आश्वासन दिले. मात्र, बाईक न देऊ शकल्याने पतीने तिला मारहाण केली आणि तिला घरातून हाकलून दिले. महत्वाचे म्हणजे ही महिला गरोदर आहे. या त्रासामुळे मंगळवारी या महिलेने तहसीलदार कार्यालय गाठले आणि तक्रार दिली. 

Web Title: prayagraj man lost his wife's in gambling for motorcycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.