नगररचना सहसंचालकांच्या मुलासह नातेवाईकाचा अटकपुर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 03:39 PM2020-07-22T15:39:24+5:302020-07-22T15:39:43+5:30

बनावट नोटरी व भाडेपट्टा तयार करत त्याचा न्यायालयीन कामासाठी वापर प्रकरण

The pre-arrest bail of a relative along with the son of the town planning joint director was rejected | नगररचना सहसंचालकांच्या मुलासह नातेवाईकाचा अटकपुर्व जामीन फेटाळला

नगररचना सहसंचालकांच्या मुलासह नातेवाईकाचा अटकपुर्व जामीन फेटाळला

Next
ठळक मुद्देतीन जणांच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाणयात गुन्हा दाखल

बारामती : बनावट नोटरी व भाडेपट्टा तयार करत त्याचा न्यायालयीन कामासाठी वापर केल्याप्रकरणी नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या मुलासह त्यांच्या नातेवाईकाचा अटकपुर्व जामीन नामंजुर करण्यात आला आहे. तर त्यांच्या मुलीला मात्र बारामती येथील अप्पर व जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपुर्व जामीन मंजुर करण्यात आला आहे.
 बनावट नोटरी व भाडेपट्टा तयार करत त्याचा न्यायालयीन कामासाठी वापर केल्याप्रकरणी त्यांची मुलगी गीतांजली हनुमंत नाझीरकर, मुलगा भास्कर हनुमंत नाझीरकर  (रा. स्वप्नशील्प अपार्टमेंट, कोथरुड, पुणे) व हेमंत प्रल्हाद पोंदकुले (पत्ता माहित नाही)  या तीन जणांच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाणयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संग्राम तानाजी सोरटे (रा. मगरवाडी, ता. बारामती) यांनी याबाबत २६ जुन रोजी फिर्याद दिली होती.फिर्यादीनुसार दि. ९ डिसेंबर २०१९ ते २६ जून २०२० या कालावधीत बारामतीत विद्युत मंडळाच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी व त्यांचा भाऊ प्रवीण यांच्या नावे  बनावट नोटरी भाडे करार व भाडेपट्टा तयार करत ती खरी आहेत असे भासवून नाझीरकर व पोंदकुले यांनी ती कागदपत्रे बारामतीतील विद्युत मंडळ कार्यालयात दाखल केली. विद्युत पुरवठा कायम राहावा म्हणून त्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. प्रवीण यांच्या नावे बनावट भाडेपट्टा तयार करत विद्युत मंडळा विरुद्ध मनाई मिळावी यासाठी तो बारामती न्यायालयात वापरण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात भादंवि कलम ४६७, ४७१,४७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयात मंगळवारी(दि २१) आरोपींच्या अटकपुर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली.यावेळी सरकारी वकील अ‍ॅड स्नेहल बडवे नाईक यांनी युक्तीवाद केला. आरोपी भास्कर नाझीरकर याने नोटरी भाडे करारावर फिर्यादी यांचे भाऊ प्रविण सोरटे याची खोटी सहि केली आहे.त्या सहिचे नमुने घेणे आवश्यक आहे.त्यामुळे आरोपीला अटक करुन तपास करणे आवश्यक आहे. आरोपीकडुन मुळ नोटरी करार हस्तगत करावयाचा असुन गुन्ह्यातील आरोपीने विद्युत मंडळाला सादर केलेला भाडे करार व भाडे पट्याचा तपास करावयाचा आहे. तसेच आरोपी हेमंत याने खरेदी केलेल्या स्टँपचे  ठीकाण,भाडेकरार केलेल्या ठीकाणाबाबत तपास करावयाचा आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी बनावट दस्तऐवज बनविताना शिक्के बनविल्याची शक्यता आहे.हे शिक्के बनविलेल्या ठीकाणाबाबतचा तपास करावयाचा आहे. सबंधित गुन्हा बनावट दस्तऐवज तयार करुन फसवणुकीचा असल्याने आरोपी माहिर आहेत.त्यामुळे आरोपींनी आणखी कोठे फसवणुकीचा दखलपात्र गुन्हा केला आहे का?याबाबत तपास करणे आवश्यक आहे,असा युक्तीवाद अ‍ॅड बडवे— नाईक  यांनी न्यायालयात केला आहे. न्यायालयाने तो मान्य करत दोघांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला. तर नाझीरकर यांच्या मुलीचा मात्र मंजूर करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांना का शोधू शकत नाही हे मोठे कोडे आहे.

Web Title: The pre-arrest bail of a relative along with the son of the town planning joint director was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.