विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांचा मारेकरी सापडला; मुंबईतून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 09:37 IST2020-02-06T09:36:26+5:302020-02-06T09:37:33+5:30
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांचा मारेकरी सापडला; मुंबईतून अटक
मुंबई : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बच्चन यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडल्या होत्या. यापैकी एका हल्लेखोराला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे.
रणजीत हे रविवारी सकाळी वॉकसाठी बाहेर पडले होते. यावेळी त्यांचा भाऊही सोबत होता. परिवर्तन चौकामध्ये ग्लोब पार्कमधून बाहेर पडताच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एक गोळी डोक्याला लागल्याने रणजीत यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते.
रणजीत यांच्या हत्येनंतर हल्लेखोर मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमधून मुंबईमध्ये लपण्यासाठी आला होता. लखनऊ पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांचे पथकही मुंबईत दाखल झाले. त्यांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली.