गरिबीचं नाटक करुन ती बांधायची लग्नगाठ, नवऱ्याला फसवून दाखवायची स्वत:चा थाट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 08:01 PM2021-04-14T20:01:40+5:302021-04-14T20:02:11+5:30
Fraud Women : शांतीनगर पोलिसांनी भामट्या तारुणीसह तिच्या आईला व त्यांची आणखी एक महिला साथीदार अशा तीन महिलांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
नितिन पंडीत
भिवंडी - फसवणुकीचा अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात मात्र वेगवेगळ्या तरुणांशी गरिबीच्या नावाने लग्न करून त्यांच्याकडून पैसे व दागिने घेऊन नव विवाहित वराची फसवणूक झाल्याचा प्रकार भिवंडीत समोर आला आहे. गरिबीच्या नावाने लग्न करून तरुणांना लुटल्या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी भामट्या तारुणीसह तिच्या आईला व त्यांची आणखी एक महिला साथीदार अशा तीन महिलांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
रिना देवरे वय २३ वर्ष असे गरिबीच्या नावाने लग्न करून तारूंना लुटणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ती आपली आई मंगला देवरे व मावशी सुनीता संजय माहिरे यांच्या मदतीने रीना हिचे आई वडील नाही ती खूप गरीब आहे अशी खोटी माहिती सांगून रिना हिचे लग्न लावत असत. मात्र लग्न झाल्यानंतर रीना आपल्या पतीला वेगवेगळी खोटी कारणे सांगून पळून जायची , जातांना लग्नात नवरदेवाने दिलेले पैसे व दागिने घेऊन पळून जायची. वेगवेगळ्या ठिकाणचा खोटा पत्ता त्या प्रत्येकवेळी नवनवीन नावऱ्यांनर देत असल्याने तिचा पत्ता देखील कोणाला सापडत नव्हता.
३० मार्च रोजी भादवड येथील हरेश उत्तम पाटील याच्याशी तिचा चौथा विवाह झाला होता. या याआधी रिना हिने सुरत , मालेगाव , पुणे येथील तरुणांना लग्न करून फसवले होते, तर तिचा पाचवा विवाह धुळे येथील एका तरुणाशी ठरला होता. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी रीना लग्न करतांना गरिबीचे कारण पुढे करून नवऱ्या मुलाच्या घरी जाऊन लग्न करत असे, ३० मार्च रोजी ती भादवड येथील हरेश याच्या घरी आली तिथे हरेश सोबत तिचा विवाह देखील झाला , सुरुवातीला तिने हरेशकडून ५ हजार रुपये घेतले त्यानंतर लग्नाच्या खरेदीसाठी ४० हजार रुपये घेतले व त्यांनतर २९ मार्च रोजी हळदीच्या दिवशी आईला कोरोना झाला असे सांगून ५०हजार रुपये ब्यांक खात्यात ट्रान्सफर करून घेतले आपली होणारी पत्नी गरीब असल्याने मदतीच्या नावाने हरेशने रिना हिला ९५ हजार रुपये दिले व लग्नात तिला सोन्याचे दागिने देखील केले होते.
मात्र, त्यांनतर रिना व तिच्या आईने तिचा पाचवा विवाह धुळे येथील एका तारुणासोबत जमविला होता या तरुणाकडून रिनाने ६० हजार रुपये घेतले होते, त्याच्याशी विवाह करायचा असल्याने रीना हिने माहेरी जाण्याचा हट्ट धरला होता त्यासाठी पतीला आईची तब्बेत बरी नसल्याचा कारण सांगितला , मात्र पतीने मी देखील सोबत येतो असे सांगितल्या नंतर रीना हिने त्यास नकार दिला व विनाकारण भांडण करण्यास सुरुवात केली अखेर पत्नीच्या वागण्याचा पती हरेश यांस संशय आल्याने त्याने मंगळवारी थेट शांतीनगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली असता शांतीनगर पोलिसांनी रिना , तिची आई मंगला देवरे व मावशी सुनीता माहिरे यांना ताब्यात घेतले असता फसवणुकीचा सर्व प्रकार समोर आला. या फसवणूक प्रकरणी या तिघी महिलांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघींना देखील अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या महिलांनी आणखी किती जणांनी अशा प्रकारे फसवणूक केली आहे का यादृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहेत.