डियो घेण्याचा केला बहाणा अन् दोन तोळ्यांच्या चेनवर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 11:51 IST2023-07-18T11:51:37+5:302023-07-18T11:51:46+5:30
तत्काळ घटनास्थळी येत पाहणी करत आजूबाजूचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

डियो घेण्याचा केला बहाणा अन् दोन तोळ्यांच्या चेनवर डल्ला
सुदर्शन सारडा
ओझर , जि नाशिक : येथे वर्दळीच्या ठिकाण असलेल्या शिवाजी रोड वरील अक्षता गिफ्ट दुकानात सकाळी साडे नऊच्या सुमारास गळ्यातील दोन तोळ्यांची चेन ओढून नेल्याची घटना घडली आहे. दुकान उघडल्यावर स्वच्छता झाल्यानंतर सकाळी साडे नऊच्या सुमारास दोन जण बाईक वरून आले. तोंडाला मास्क अन् हेल्मेट घातलेले दोघांनी गाडी दुकानासमोर थांबवली. त्यातील मागे बसणारा दुकानात येऊन डियो दाखवा असे दुकानातील पुष्पा रामकिसन लढ्ढा यांना सांगून पाच मिनिटे टाईमपास केला.रेकी करून झाल्यावर आजूबाजूला पाहून हिरव्या रंगाच्या टीशर्ट घातलेल्या तरुणाने दोन टोळ्यांची गळ्यातील चेन खेचत धूम ठोकली.पुष्पा लढ्ढा यांनी आरडाओरड केली पण तोवर जास्त वर्दळ नसल्याने चोरट्यांनी पोबारा केला.
दरम्यान ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी तत्काळ घटनास्थळी येत पाहणी करत आजूबाजूचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही महिन्यातील दुसरी घटना
याच रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी उगले नामक महिलेची अशीच सोनसाखळी ओढली गेली. त्यानंतर हा दुसरा प्रकार घडला आहे.यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली असून विशेषतः संपूर्ण ओझर गावातील रस्त्यांची झालेली अवस्था दैनीय असताना शिवाजी रोडच काँक्रिट असल्याने चोरट्यांची नजर याच रस्त्यांवर असल्याचे अधोरेखित झाले आहे.