लातूरमध्ये अधिकारी असल्याची बतावणी करुन दीड लाखांचे दागिने पळविले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 07:52 PM2022-02-13T19:52:55+5:302022-02-13T19:54:15+5:30
विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दाेघाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर : आपण अधिकारी आहाेत, अशी बतावणी करून एका वृद्धाकडे असलेले दीड लाखांचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची घटना शनिवारी औसा राेडवरील बांधकाम भवन परिसरात घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दाेघाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी सुभाष भानुदासराव सूर्यवंशी (७० रा. पेठ ता. लातूर) हे औषध-गाेळ्या आणण्यासाठी दुचाकीवरुन लातूरला येत हाेते. दरम्यान, दाेन अनाेळखी व्यक्ती औसा राेडवरील शासकीय विश्रामगृहासमाेर माेटारसायकवरुन आले. यावेळी आम्ही पाेलीस अधिकारी आहाेत अशी बतावणी केली. लातूर शहरामध्ये साेने घालून काेठे फिरत आहेत? असे म्हणून गळ्यातील तीन ताेळे साेन्याचे लाॅकेट, दाेन ताेळ्याची साेन्याची अंगठी हे हातरुमालामध्ये बांधून माझ्या माेटारसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवण्याचा बहाणा केला. यावेळी हातचालाखीने ते साेन्याचे दागिने काढून घेत माझी १ लाख ४५ हजार रुपयांना लुबाडणूक केली.
याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात १२ फेब्रुवारी राेजी दिलेल्या जबाबावरुन दाेघा अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस उपनिरीक्षक महेश गळगटे करीत आहेत.