‘गर्भधारणा विधी’चा बहाणा; अनेक महिलांवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 05:57 AM2023-03-20T05:57:26+5:302023-03-20T05:57:41+5:30

शेखला १६ मार्च रोजी अहमदाबाद येथून पकडण्यात आले. तो खेडा जिल्ह्यातील कपडवंज येथील रहिवासी आहे.

Pretext of 'pregnancy ritual'; Many women were raped | ‘गर्भधारणा विधी’चा बहाणा; अनेक महिलांवर बलात्कार

‘गर्भधारणा विधी’चा बहाणा; अनेक महिलांवर बलात्कार

googlenewsNext

अहमदाबाद : गर्भधारणेच्या विधीच्या बहाण्याने एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अहमदाबाद गुन्हे शाखेने शनिवारी राजस्थानमधून २१ वर्षीय तांत्रिकाला अटक करण्यात आली आहे.

अहमदाबाद गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चैतन्य मंडलिक म्हणाले की, काही दिवसांपूर्वी (पश्चिम) महिला पोलिस ठाण्यात अपत्यहीन महिलेवर मूल होण्यासाठी विधीच्या नावाखाली बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. अपत्य प्राप्तीची आस असलेल्या महिला शोधून दिलावर (शेख) नावाचा व्यक्ती त्यांना मुकेश ग्रासिया नावाच्या तांत्रिकाकडे नेत असे. तांत्रिकाने विधीच्या नावाखाली अनेक महिलांवर बलात्कार केला.

शेखला १६ मार्च रोजी अहमदाबाद येथून पकडण्यात आले. तो खेडा जिल्ह्यातील कपडवंज येथील रहिवासी आहे. मुकेशला शनिवारी राजस्थानमधून पकडण्यात आले. “मुकेशच्या मोबाइल फोनची तपासणी केली जात आहे. त्यात अनेक व्हिडीओ आणि फोटो सापडले आहेत, त्यावरून त्याने अनेक महिलांशी असे गैरवर्तन केल्याचा संशय आहे.

पैशाचा वर्षाव होईल
मुकेश, ज्याला “भुवाजी” देखील म्हटले जाते, त्याने शेखला सांगितले की एक विधी आहे ज्याद्वारे निपुत्रिक स्त्रिया गरोदर राहतील आणि ज्यांना पैसे हवेत त्यांच्यावर पैशाचा वर्षाव होईल. भुवाजीने महिलेला विधीद्वारे पैशाचा वर्षाव होईल आणि तिघेही पैसे आपसात वाटून घेऊत, अशी थाप मुकेशने मारली होती.

Web Title: Pretext of 'pregnancy ritual'; Many women were raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.