अल्पवयीन मुला-मुलीचा नियोजित विवाह रोखला; फ्रेजरपुरा पोलीस हव्याप्र मंडळाच्या चाईल्ड लाईनची यशस्वी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 08:13 PM2021-06-30T20:13:14+5:302021-06-30T20:15:06+5:30

Child Marriage Case : मुलाचे विवाहाचे वय हे २१ वर्षीय असल्याने तोसुद्धा अल्पवयीन मानला जात आहे.

Prevented the planned marriage of a minor boy or girl; Successful action of Child Line of Frazerpura Police Havipra Mandal | अल्पवयीन मुला-मुलीचा नियोजित विवाह रोखला; फ्रेजरपुरा पोलीस हव्याप्र मंडळाच्या चाईल्ड लाईनची यशस्वी कामगिरी

अल्पवयीन मुला-मुलीचा नियोजित विवाह रोखला; फ्रेजरपुरा पोलीस हव्याप्र मंडळाच्या चाईल्ड लाईनची यशस्वी कामगिरी

googlenewsNext
ठळक मुद्देपारधी बेड्यावरील नागरिकांची गर्दी झाली होती. मुला-मुलीला चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात आले.

अमरावती : फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील राजुरा येथील पारधी बेड्यावर एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा नियोजित विवाह बुधवारी सकाळी पार पडणार असल्याची माहिती फोनवरून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाईल्ड लाईन’ला मिळाली. त्यानंतर चाईल्ड लाईनचे पदाधिकारी व फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला. त्यानंतर मुलगासुद्धा २० वर्षीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


मुलाचे विवाहाचे वय हे २१ वर्षीय असल्याने तोसुद्धा अल्पवयीन मानला जात आहे. त्यामुळे दोघांचाही विवाह रोखण्यात आला. मुला-मुलीच्या परिवाराने दोघांचेही वय विवाहास योग्य असल्याचे सांगून पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी व चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली.

यावेळी पारधी बेड्यावरील नागरिकांची गर्दी झाली होती. मुला-मुलीला चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, पोलीस निरीक्षक नितीन मगर, एपीआय सोनाली मेश्राम, महिला पोलीस नाईक वैशाली सुर्जेकर तसेच हव्याम प्रसारक मंडळ चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक शंकर बी. वाघमारे, जिल्हा बालसंरक्षक अधिकारी अजय डबले, पंकज शिंगारे यांच्यासह पोलीस पाटील हनुमान शेळके, अंगणवाडी सेविका पवार व मानकर उपस्थित होत्या.

 

Web Title: Prevented the planned marriage of a minor boy or girl; Successful action of Child Line of Frazerpura Police Havipra Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.