"मुख्याध्यापक गळ्यात हात घालून फोटो काढतात..."; शिक्षिकेने सांगितला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 01:08 PM2023-04-08T13:08:04+5:302023-04-08T13:12:08+5:30
मुख्याध्यापक करतार सिंह यांनी शाळेतील एका शिक्षिकेचा अनेकदा विनयभंग आणि चुकीचं वर्तन केल्याचा आरोप आहे.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील उच्च प्राथमिक शाळेत नियुक्त केलेल्या मुख्याध्यापकाला BSA ने निलंबित केलं आहे. मुख्याध्यापक करतार सिंह यांनी शाळेतील एका शिक्षिकेचा अनेकदा विनयभंग आणि चुकीचं वर्तन केल्याचा आरोप आहे. शिक्षिकेने याला विरोध केला असता मुख्याध्यापकांनी तिला शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. हे सर्व शिक्षिका बराच वेळ सहन करत राहिली होती.
शिक्षिकेने मात्र हा सर्व प्रकार रोज घडू लागल्यावर एबीएसएकडे तक्रार केली. हे प्रकरण राया ब्लॉकचे आहे. शिक्षिकेने सांगितले की, प्रिन्सिपल करतार सिंह तिच्यासोबत हे सर्व खूप दिवसांपासून करत होते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सांगितले की, "मुख्याध्यापक माझ्या गळ्यात हात घालायचे. मग विद्यार्थ्यांना फोटो काढायला सांगायचे. घरी जातानाही मला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसायला सांगत असे."
"मुख्याध्यापकांसोबत आणखी एक व्यक्तीही होती. त्याच्यासमोरही ते माझ्यासोबत अश्लील कृत्य करायचे." शिक्षिकेने पुढे सांगितले की, तिने अनेकदा विरोध केला. त्यामुळे मुख्याध्यापक शाळेतून काढून टाकण्याची धमकी देत असत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रार आल्यानंतर राया एबीएसए यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासात प्रथमदर्शनी आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी बीएसएला पत्र लिहून करतार सिंह यांच्या निलंबनाची शिफारस केली होती. तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतर बीएसएने प्राचार्य करतार सिंह यांना निलंबित केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"