खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 01:14 PM2020-08-06T13:14:06+5:302020-08-06T13:16:48+5:30
खूनप्रकरणात भोगत होता शिक्षा : न्यायालयाने दिले चौकशीचे निर्देश
वर्धा : खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानाने बॅरेकमध्येच दुपट्याने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने जिल्हा कारागृहात एकच खळबळ उडाली. गोपीचंद रामचंद्र डहाके (३८) असे मृत कैद्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील रहिवासी गोपीचंद डहाके याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणात उमरखेड न्यायालयाने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मृत गोपीचंद यापूर्वी अमरावती येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे त्याला वर्धा येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी मृत गोपीचंद डहाके याला पेरॉलवर सोडण्यात आले होते. पण, पेरॉलचा कालावधी संपल्यावरही तो कारागृहात परतला नसल्याने अमरावती आणि वर्धा पोलीस त्याचा शोध घेत होती.
आरोपी गोपीचंद हा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असल्याने याबाबातची माहिती यवतमाळ पोलिसांनाही देण्यात आली होती. गोपीचंद हा उमरखेड येथे त्याच्या गावात आल्याची माहिती पोलिसांना मिळताच यवतमाळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याची संपूर्ण चौकशी आणि तपासणी केल्यावर त्याला वर्धा येथील जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपासून बंदीवान गोपीचंद हा नैराश्यात होता. त्याने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुपट्याने बॅरेकमध्ये असलेल्या खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली.
लटकलेल्या अवस्थेत गोपीचंदचा मृतदेह दिसताच बॅरेकमधील कैद्यांनी याची माहिती कारागृहातील अधिकाºयांना दिली. काही वेळातच शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी कारागृहात दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी नेला. याप्रकरणाची शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेश पारधी करत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी
रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या
संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात
...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!