खाजगी बस ट्रॅव्हलच प्रवाशांकडून पैसे उकळून देतायेत बनावट कोविड टेस्ट रिपोर्ट  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 08:13 PM2021-04-13T20:13:00+5:302021-04-13T20:13:32+5:30

Fake covid test report :गुजरातला जाणाऱ्या बसमधील २१ जणांचे दाखले बनावट 

Private bus travel only boils down money from passengers Fake covid test report | खाजगी बस ट्रॅव्हलच प्रवाशांकडून पैसे उकळून देतायेत बनावट कोविड टेस्ट रिपोर्ट  

खाजगी बस ट्रॅव्हलच प्रवाशांकडून पैसे उकळून देतायेत बनावट कोविड टेस्ट रिपोर्ट  

Next
ठळक मुद्दे३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून नीता व पवन ट्रॅव्हल्समधील आरोपींचा काशीमीरा पोलीस शोध घेत आहेत. 

मीरारोड - खाजगी ट्रॅव्हल्सच्या बस ने गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांना सदर ट्रॅव्हलवालेच जास्त पैसे आकारून चक्क बनावट कोविड चाचणी अहवाल बनवून देत असल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून नीता व पवन ट्रॅव्हल्समधील आरोपींचा काशीमीरा पोलीस शोध घेत आहेत.  बनावट दाखले देणारी मोठी टोळीच सक्रिय असल्याची शक्यता आहे. 

कोरोनाचा संसर्ग फोफावल्याने अन्य राज्यात जाणाऱ्या वा येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मुंबई परिसरातून गुजरातला बस ने  प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या काही ट्रॅव्हलचे मालक व चालक हे प्रवाशांकडून जास्त पैसे घेऊन त्यांना बनावट कोविड चाचणी अहवाल देत असल्याची माहिती मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष १चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांना मिळाली .  

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कुराडे यांनी पोलीस निरीक्षक संपतराव पाटील , उपनिरीक्षक हितेंद्र विचारे सह शिंदे , वाडिले , थापा , ढेमरे , निलंगे , चव्हाण , थोरात यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे १ च्या सुमारास घोडबंदर नाका येथे मिळालेल्या माहिती नुसार आलेली पवन ट्रॅव्हल्सची बस अडवली. सदर बसमध्ये ३१ प्रवासी तसेच बस चालक व क्लिनर असे मिळून ३३ जण होते. त्यांच्याकडील आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवालाची मागणी केली असता १९ प्रवासी आणि चालक व क्लिनर यांच्याकडे असलेले आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवाल बनावट असल्याचे आढळून आले. बसमध्ये शासनाचे नियम सुद्धा पाळले गेले नव्हते. 

कोविड चाचणी अहवाल बनवून देतो सांगून ट्रॅव्हल वाल्यानीच ह्या १९ प्रवाशांकडून प्रत्येकी ३०० रुपये घेऊन हे बनावट चाचणी अहवाल बनवून दिले होते. तर अन्य १२ प्रवाश्यां कडून चाचणी अहवाल बनवून देण्यासाठी प्रत्येकी ३०० रुपये घेण्यात आले होते मात्र अहवाल दिलाच नाही. काशीमीरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अटक आरोपी पैकी बस चालक दीपसिंग चौहान व देवीसिंग चावडा आणि क्लिनर जितेंद्रसिंग चौहान हे तिघेही गुजरातच्या अहमदाबाद मध्ये राहणारे आहेत . तर पवन ट्रेव्हेल्सचा मालक हितेशभाई , नीता ट्रेव्हेल्सचा व्यवस्थापक संदीप व कर्मचारी जिग्नेश पटेल ह्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत . कोविड चाचणीचे बनावट दाखले कुठून आणले तसेच ह्या आधी असे किती बनावट दाखले दिले गेले ह्याचा सुद्धा शोध पोलीस घेत आहेत. 

Web Title: Private bus travel only boils down money from passengers Fake covid test report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.