गुप्तांग कापलं, कापली जीभ; अंधश्रद्धेतून घडली हृदयद्रावक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 01:57 PM2022-06-28T13:57:02+5:302022-06-28T13:59:35+5:30
Murder Case : या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह सात आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत गढवा येथे रवानगी केली.
झारखंडमधील गढवा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेतून एका महिलेला तिची बहीण आणि तिच्या नवऱ्याने बेदम मारहाण केली. अंधश्रद्धेतून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. घराच्या बांधकामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी महिलेची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह सात आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत गढवा येथे रवानगी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर उतारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगीपूर गावात सात दिवसांपूर्वी गुडियावर तिची बहीण आणि मेहुणा दिनेश उरांव यांनी तंत्रसिद्धीसाठी प्रयोग केला होता. पहिल्या दिवशी त्याने गुडियाची जीभ कापली. यानंतर दुसऱ्या दिवशी महिलेचे गुप्तांग कापण्यात आले, त्यामुळे तिचा तडफडून मृत्यू झाला.
या संपूर्ण घटनेत मृत महिलेचा पतीही समोर होता. मात्र, तो काही बोलला नाही. मयताची बहीण व भाओजीने मृतदेह रांका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरा येथील मामाच्या घरी नेऊन जाळला व शांतपणे घरी आले. ही बाब शहर उतारी पोलिसांना समजताच पोलिसांनी तातडीने महिलेच्या घरी पोहोचून चौकशी केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे.
श्री बंशीधर नगर पोलिस ठाण्यात एसडीपीओ प्रमोद कुमार केसरी यांनी सांगितले की, 21 जून रोजी उंटारी पोलिस स्टेशन क्षेत्रातील जंगीपूर गावात मुन्ना उरांवची पत्नी गुडिया देवी हिच्या हत्येची माहिती मिळाली होती. पुरावे नष्ट करण्यासाठी रांका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरा गावात असलेल्या स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यात आल्याचेही सांगण्यात आले. स्टेशन प्रभारी योगेंद्र कुमार यांनी या प्रकरणाचा तपास केला. यानंतर महिलेचा पती मुन्ना उरांव, बहीण ललिता देवी, मेहुणा दिनेश उरांव यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ललिता देवी, दिनेश उरांव, सुर्जी कुंवर, कुंदन उरांव, सूरज उरांव, पती मुन्ना उरांव आणि मृत गुडियाची बहीण रामशरण उरांव यांचा समावेश आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलिस छापे टाकत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत गढवा येथे रवानगी करण्यात आली आहे. एसडीपीओ म्हणाले की, नगर उंटारी, मेरळ आणि रांका पोलिस स्टेशन परिसरातून सात जणांना अटक करण्यात आली असून मृतदेहाच्या जळलेल्या अवशेषांसह तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.