चित्रपटात काम देण्याच्या अमिषाने वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या निर्मात्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 08:34 PM2021-07-18T20:34:56+5:302021-07-18T20:35:26+5:30
Arrested by Police : त्याच्यासह अन्य दोघांना पकडण्यात आले आहे. तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली.
मीरारोड - चित्रपटात काम देतो सांगून तरुणींना वेश्याव्यवसायास लावणाऱ्या परमानंद बालचंदानी (६८) या सी ग्रेड चित्रपट निर्मात्यास मीरारोड मधून अटक केली आहे. त्याच्यासह अन्य दोघांना पकडण्यात आले आहे. तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना माहिती मिळाली की, मीरारोडच्या विदिशा शांती निकेतन इमारतीत वेश्या व्यवसाय चालवला जातो. त्या अनुषंगाने पाटील व त्यांच्या पथकातील उमेश पाटील, ढेमरे , रामचंद्र पाटील , विजय निलंगे , गावडे, शिंदे व महिला पोलीस यंबर , चव्हाण यांनी गुरुवारी सापळा रचून कारवाई केली.
परमानंद हा तरुणींना चित्रपटात काम देतो सांगून वाममार्गाला लावत असे. त्याचा निकटवर्तीय कन्हैलाल सह वनिता इंगळे रा. चेणे ही महिला दलाल यात सहभागी होती, याने चित्रपटात काम देण्याच्या अमिषाने महिलांना वाममार्गाला लावणाऱ्या चित्रपट निर्माता व एक इसम तसेच एका महिलेला अटक केली आहे. हे दोघे तरुणी व ग्राहक आणायचे काम करत.
परमानंद याने , ये ताकत है इश्क की , बुड्ढ़ा बीघड गया हे दोन हिंदी चित्रपट बनवले असल्याचे सांगीतले जाते. पिडित तरुणीचे फोटो ग्राहकांना व्हाट्सअप वर पाठवत होता.गेल्या १० वर्षांपासून इमारतीमधील रहीवाशांना डॉक्टर असल्याचे सांगत होता. अनेक तक्रारी करूनही पदाधिकारी दखल घेत नसल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. मीरारोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.