फेसबुकवरचा फोटो बदलला गेला अन् पोलिसांना मुलीचा किडनॅपर सापडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 03:37 PM2019-09-23T15:37:33+5:302019-09-23T15:40:54+5:30

८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

The profile photo on Facebook has been changed and the police found the girl's kidnapper! | फेसबुकवरचा फोटो बदलला गेला अन् पोलिसांना मुलीचा किडनॅपर सापडला!

फेसबुकवरचा फोटो बदलला गेला अन् पोलिसांना मुलीचा किडनॅपर सापडला!

Next
ठळक मुद्दे फेसबुकवरील प्रोफाईल फोटो बदल्यावरून पत्ता शोधून काढला आहे. आरोपीचं नाव विशाल धनराज वाईकर (२५) असं आहे.

पुणे - पुण्यातील एमआयडीसी भोसरी परिसरातून नऊ महिन्यांपूर्वी १५ वर्षीय मुलीला पूस लावून पळून नेलं होतं. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. गेल्या नऊ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय मुलीचा पोलिसांना आरोपीने फेसबुकवरील प्रोफाईल फोटो बदल्यावरून पत्ता शोधून काढला आहे. आरोपीचं नाव विशाल धनराज वाईकर (२५) असं आहे. रविवारी त्याला शिवाजी नगर कोर्टात पोलिसांनी हजर केले असता त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी एमआयडीसी भोसरी येथील नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट येथे सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या विशालने १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पूस लावून पळवून गेले. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट येथे मुलीचे आई - वडील देखील नोकरी करतात. ३१ डिसेंबरला त्यांच्या अल्पवयीन मुलीला पूस लावून विशालने पळून नेले होते. मोबाईल फोन्स देखील दोघांनी घरीच ठेवले आणि पळून गेले होते. त्यानंतर मावळ येथील एमआयडीसी फ्लोरिकल्चर पार्कमध्ये माळ्याचे काम विशाल आणि अल्पवयीन मुलगी करत होती. दरम्यान २ जानेवारी २०१९ रोजी मुलीच्या पालकांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याबाबत तक्रार दाखल केली. पोलीस नऊ महिने या मुलीचा माग काढत होते. दरम्यान, विशाल वाईकरने फेसबुकवर प्रोफाईल फोटो बदल्याने पोलिसांना मुलीचा पत्ता लागला आणि मोबाईलमध्ये फेसबुक ऍक्टिव्हेट असल्याने सोशल मीडियाद्वारे पोलिसांनी आरोपीचे लोकेशन ट्रेस केले आणि तळेगाव येथून पोलिसांनी शनिवारी अटक केली. विशालविरोधात भा. दं. वि. कलम ३६३, ३७६ (१), ३६६, ४१७, आणि पॉक्सो कायदा कलम ३, ४, ७, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: The profile photo on Facebook has been changed and the police found the girl's kidnapper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.