वेश्याव्यवसायाचा काशिमीऱ्यात पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:14 AM2018-12-24T06:14:45+5:302018-12-24T06:15:07+5:30

काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-अमदाबाद महामार्गावर असलेल्या एका लॉजमध्ये चालणारा वेश्याव्यवसाय पोलिसांनी उघडकीस आणला.

 Prohibition of prostitution | वेश्याव्यवसायाचा काशिमीऱ्यात पर्दाफाश

वेश्याव्यवसायाचा काशिमीऱ्यात पर्दाफाश

googlenewsNext

मीरा रोड  - काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-अमदाबाद महामार्गावर असलेल्या एका लॉजमध्ये चालणारा वेश्याव्यवसाय पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी लॉजच्या चौघा कर्मचाºयांना अटक केली असून, चालक व मालकाचा शोध सुरू आहे.
भार्इंदर विभागाचे साहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना महामार्गालगत असलेल्या हॉटेल रिजेन्सी लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती मिळाली. शनिवारी दुपारी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून याची खात्री केल्यानंतर छापा टाकला. या धाडीत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली.
लॉजचा व्यवस्थापक प्रशांत शेट्टी व विनयकुमार यादव यांना अटक करण्यात आली आहे. लॉजच्या चालक व मालकाचा शोध सुरू आहे. हा लॉज पूर्वी रेड हॉर्स बार - लॉज व नवरत्न रेसिडेन्सी या नावाने होता. आॅर्केस्ट्रा बार बंद झाला असला तरी लॉजमधून वेश्या व्यवसाय सुरूच होता.

Web Title:  Prohibition of prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.