पत्नीने सेक्स करण्याचे वचन केले नाही पूर्ण; संतापलेल्या पतीने उचलले हे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 09:59 PM2021-12-29T21:59:07+5:302021-12-29T21:59:51+5:30
Crime News :वास्तविक त्याच्या पत्नीने ख्रिसमसच्या दिवशी त्याच्यासोबत सेक्स करण्याचे वचन दिले, त्यानंतर त्याने व्हायग्रा घेतली. पण बायकोचा मूड बदलला. यानंतर रागाच्या भरात त्या व्यक्तीने तिची हत्या केली.
इटलीत एका पेन्शनर व्यक्तीने आपल्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वास्तविक त्याच्या पत्नीने ख्रिसमसच्या दिवशी त्याच्यासोबत सेक्स करण्याचे वचन दिले, त्यानंतर त्याने व्हायग्रा घेतली. पण बायकोचा मूड बदलला. यानंतर रागाच्या भरात त्या व्यक्तीने तिची हत्या केली.
इटलीतील ग्रैडारा शहरातील प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण इटलीच्या ग्रैडारा शहरातील आहे. जिथे 80 वर्षीय विटो कांगिनीवर पत्नीच्या हत्येचा आरोप आहे. कारण त्याची 61 वर्षीय पत्नी नतालिया किरीचोकने सेक्स करण्यास नकार दिला होता.
बॉससोबत अफेअरचा आरोप
डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, त्या व्यक्तीने आपल्या पत्नीवर चाकूने 4 वार केले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आरोपी पतीने पत्नीवर बॉससोबत अफेअर असल्याचा आरोपही केला आहे. स्थानिक मीडियानुसार, जेव्हा पत्नीने त्याला नकार दिला तेव्हा त्याने तिच्यावर चाकूने वार केले आणि कथितरित्या तिचा मृतदेह जमिनीवर तसाच रस्त्याच्या थारोळ्यात सोडला.
रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने नाश्ता केला, आपल्या कुत्र्यांना फिरायला नेले आणि घरी परत आला. त्याने सर्व काही नेहमीसारखे उरकले जणू काही घडलेच नाही. यानंतर दुपारच्या सुमारास तो पुन्हा आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेला आणि सर्व प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. त्या व्यक्तीने शेजाऱ्याला पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यास सांगितले.
यानंतर त्या व्यक्तीच्या पत्नीच्या मैत्रिणीने फोनवर कॉल केला. आरोपी पतीने तिला सर्व प्रकार सांगितला आणि पोलिसांना बोलावण्यास सांगितले. पण मैत्रिणीला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर त्याने रेस्टॉरंटमध्ये फोन केला जिथे त्याच्या पत्नीने दोन वर्षे शेफ म्हणून काम केले होते आणि मालकाला सांगितले की, तो तिला पुन्हा कधीही पाहणार नाही. त्यानंतर रेस्टॉरंटच्या मालकाने पोलिसांना बोलावले आणि अधिकारी जेव्हा संशयिताच्या घरी गेले तेव्हा त्यांना पीडितेचा मृतदेह सापडला.