दिल्ली पोलीस इन अ‍ॅक्शन! नुपूर शर्मा, सबा नकवी, मुफ्ती नदीमसह ९ जणांविरोधात FIR

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 09:00 AM2022-06-09T09:00:05+5:302022-06-09T09:00:59+5:30

नुपूर शर्मा यांच्याविरोधात मुंबई, ठाणे, पुणे व हैदराबादसह अनेक ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे.

prophet controversy delhi police file fir against nupur sharma navin kumar jindal shadab chauhan and 7 others | दिल्ली पोलीस इन अ‍ॅक्शन! नुपूर शर्मा, सबा नकवी, मुफ्ती नदीमसह ९ जणांविरोधात FIR

दिल्ली पोलीस इन अ‍ॅक्शन! नुपूर शर्मा, सबा नकवी, मुफ्ती नदीमसह ९ जणांविरोधात FIR

Next

नवी दिल्ली: भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी वृत्तवाहिनीवरील चर्चेत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर देशात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. आखाती देशांनीही नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत मोदी सरकारकडे नाराजी व्यक्त केली. यानंतर आता नुपूर शर्मांसह नवीन कुमार जिंदल, शादाब चौहान, सबा नकवी, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुल रहमान, गुलजार अन्सारी, अनिल कुमार मीणा आणि पूजा शकुन यांच्याविरोधात दिल्लीपोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

नुपूर शर्मा यांच्याविरोधात मुंबई, ठाणे, पुणे व हैदराबाद या चार शहरांमध्ये गुन्हा दाखल झाला असला, तरी दिल्लीत मात्र त्यांच्याविरोधात तक्रार दाखल नव्हती. आता, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर विभागाने या सर्व नऊ जणांविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे. विविध धर्माविरुद्ध आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. 

भाजपसह विश्व हिंदू परिषदेने दर्शवला पाठिंबा

देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा गदारोळ झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी दिलगिरी व्यक्त करत आपण शब्द मागे घेत असल्याचे म्हटले होते. तर, विरोधकांनी नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. दुसरीकडे, ‘विहिंप’चे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी नुपूर शर्मा यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. नुपूर शर्मा यांचे विधान कायदेशीर की, बेकायदा आहे, हा गुन्हा आहे की नाही, हे न्यायालयच ठरवू शकते. पण, न्यायालयाच्या निकालाची वाट बघण्याआधीच देशभर हिंसाचार केला जात आहे, असे मत व्यक्त करत आलोक कुमार यांनी नुपूर शर्मा यांना पाठीशी घातले.

दरम्यान, भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्ष प्रवक्त्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात विशेषत: धार्मिक भावना दुखावू नयेत, असे निर्देश दिले आहेत. भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी एका विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर इस्लामिक देशांनी भारताविरुद्ध राजकीय स्तरावर विरोध व्यक्त केला. तसेच भारतीय उत्पादनावर बहिष्काराचे आवाहनही केले. त्या पार्श्वभूमीवर भाजपने उपरोक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भाजपच्या एक राष्ट्रीय पदाधिकाऱ्यानुसार सर्व नेते आणि प्रवक्त्यांना कठोर निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय  प्रसार माध्यम विभागाच्या परवानगीशिवाय निवेदन जारी करु नये. कोणता प्रवक्ता,कोणत्या टीव्ही चॅनलवर पक्षाची बाजू मांडेल, हे भाजपची माध्यम समिती ठरविते. यासाठी त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित केल्या जातात. 
 

Web Title: prophet controversy delhi police file fir against nupur sharma navin kumar jindal shadab chauhan and 7 others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.