विमाननगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 02:39 PM2018-10-09T14:39:36+5:302018-10-09T14:46:47+5:30
मसाज सेंटरच्या नावाखाली थाई तरुणींकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेणाºया दोघांना विमानतळ पोलिसांनी नुक्तीच अटक केली .
विमाननगर : मसाज सेंटरच्या नावाखाली थाई तरुणींकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेणाºया दोघांना विमानतळ पोलिसांनी नुक्तीच अटक केली .स्वप्नील गायकवाड (वय३३, रा. स्वप्ननगरी अपार्टमेंट सिंहगड रोड, पुणे) व रोज खैदम (वय २७ रा. कोरेगाव पार्क मुळची रा. इम्फाळ, मणिपूर) या दोघांविरुद्ध पिटा एक्ट नुसार गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली. याठिकाणी ६ पीडित तरुणींकडून मसाज सेंटरच्या नावाखाली बळजबरीने वेश्याव्यवसाय सुरू होता. त्यातून त्यांची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर दत्तमंदिर चौक येथील औरा थाई स्पा सेंटर या ठिकाणी थाई तरुणींकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती येरवडा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश गावडे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ व येरवडा पोलीस स्टेशन यांची दोन पथके तात्काळ तयार करून सदर ठिकाणी रवाना करण्यात आली . याठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवून बळजबरीने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायातील सहा परदेशी तरुणींची सुटका करण्यात आली. यामध्ये तीन थाई, दोन भारतीय व एक परदेशी तरुणीचा समावेश आहे. मसाज सेंटर चालविणारा स्वप्नील गायकवाड व त्याची हस्तक रोज हिला पोलिसांनी ताब्यात घेतले . त्यांच्याकडून रोख रक्कम दहा हजार रुपये, दोन मोबाईल व इतर साहित्य पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले . विमानतळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक चित्रा चौधरी यांनी दिलेल्या फियार्दीवरून आरोपींवर पिटा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे करीत आहेत .