इमारतीत सुरु होता वेश्या व्यवसाय, पोलिसांनी केली ४ जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 08:05 PM2020-12-04T20:05:37+5:302020-12-04T20:06:02+5:30

Prostitution : वेश्या व्यवसायास लावलेल्या ३ पीडित तरुणींची सुटका पोलिसांनी केली आहे. 

Prostitution was started in the building, police arrested 4 people | इमारतीत सुरु होता वेश्या व्यवसाय, पोलिसांनी केली ४ जणांना अटक 

इमारतीत सुरु होता वेश्या व्यवसाय, पोलिसांनी केली ४ जणांना अटक 

Next
ठळक मुद्देहे चौघेही महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन त्यांना वेश्या व्यवसायात ढकलत होते . काशीमीरा पोलीस ठाण्यात ह्या चार हि जणांविरुद्ध पिटा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मीरारोड - मीरारोडच्या हाटकेश परिसरातील एका सदनिकेतून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या चौघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली आहे. वेश्या व्यवसायास लावलेल्या ३ पीडित तरुणींची सुटका पोलिसांनी केली आहे. 

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक डी . एस . पाटील , सहाय्यक निरीक्षक देविदास हंडोरे व पोलीस पथकाने मिळालेल्या माहिती वरून सापळा रचून न्यू ओम कॉम्प्लेक्समधील इमारत क्रमांक ११  मध्ये धाड  टाकली . तेथे सुरेंद्र श्रीधर तिर्लोटकर ( ४२ ) रा . शिवनेरी कंपाउंड , रावळपाडा , दहिसर ; कीर्ती प्रभाकर मेस्त्री ( ३४ ) रा. तुमडे चाळ , अशोकवन, दहिसर ; रोशनी अन्वर खान ( ३१ ) रा. दामूनगर , कांदिवली व हिना युसूफ खान ( ३८ ) रा . अगरवाल लाईफ स्टाईल , विरार ह्या चौघांना अटक करण्यात आली. हे चौघेही महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन त्यांना वेश्या व्यवसायात ढकलत होते . काशीमीरा पोलीस ठाण्यात ह्या चार हि जणांविरुद्ध पिटा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Prostitution was started in the building, police arrested 4 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.