मनोरुग्णाने मारली पहिल्या मजल्यावरून उडी; यंत्रणेची धावपळ, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 03:35 PM2021-02-26T15:35:35+5:302021-02-26T15:37:27+5:30
Suicide Case : संदीप नामक या तरूणाची आईही त्याला शोधत होती. अचानक तो खाली पडल्याचे लक्षात येताच त्याची आईही धावत आली,
जळगाव : मानसोपचार कक्षात दाखल एका मनोरुग्ण तरूणाने सर्व सुरक्षा यंत्रण भेदत आपात्कालीन विभागाच्या वरच्या मजल्यावर जावून थेट पलिकडे खाली उडी मारल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दुपारी बारा वाजता एकच धावपळ उडाली होती. उपस्थित परिचारिकांनी मात्र, सुरक्षा यंत्रणेच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढले.
संदीप नामक या तरूणाची आईही त्याला शोधत होती. अचानक तो खाली पडल्याचे लक्षात येताच त्याची आईही धावत आली, हा तरूण मनोरुग्ण असून त्याला बांधून ठेवा, अशी या तरूणाची आई सुरक्षा रक्षकांना सांगत होती. तरूण अचानक खाली पडल्याने त्याच्या पायाला सूज आली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. मारोती पोटे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. आस्था गनेरीवाल यांनी धाव घेत तातडीने या तरूणाला व्हिलचेअर मागवून कक्षात दाखल केले.