मनोरुग्णाने सहाव्या मजल्यावरून मारली उडी; नशीब बलवत्तर म्हणून बचावला 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 05:29 PM2018-10-13T17:29:33+5:302018-10-13T17:40:25+5:30

नशीब बलवत्तर म्हणून त्याचा पाय वायरमध्ये अडकला आणि तो थेट खाली पडण्याऐवजी चौथ्या मजल्याच्या टेरेसवर पडला. यामुळे हा तरुण थोडक्यात बचावला आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाने या युवकाची सुटका करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

The psychiatrist jumped from the sixth floor, but fortunate survived as a fortnight | मनोरुग्णाने सहाव्या मजल्यावरून मारली उडी; नशीब बलवत्तर म्हणून बचावला 

मनोरुग्णाने सहाव्या मजल्यावरून मारली उडी; नशीब बलवत्तर म्हणून बचावला 

Next

अंबरनाथ - एका मनोरुग्णाने  इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. अंबरनाथच्या पनवेलकर गार्डनमधील संकुलात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. क्लिफर्ड मॅबेन (वय ३७) असं या मनोरुग्ण तरुणाचं आहे.पण नशीब बलवत्तर म्हणून त्याचा पाय वायरमध्ये अडकला आणि तो थेट खाली पडण्याऐवजी चौथ्या मजल्याच्या टेरेसवर पडला. यामुळे हा तरुण थोडक्यात बचावला आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाने या युवकाची सुटका करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

या मनोरुग्ण तरुणाने  इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तो आत्महत्या करत्यावेळी त्याला अनेकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने कोणाचही ऐकलं नाही उडी टाकली. मात्र, सुदैवाने त्याचा पाय वायरमध्ये अडकला आणि त्यामुळे चौथ्या मजल्याच्या टॅरेसवर पडला. या घटनेत हा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचा आता पोलीस तपास करत आहे. याबाबत पोलीस क्लिफर्डच्या कुटुंबियांचीही चौकशी करणार आहे. 

Web Title: The psychiatrist jumped from the sixth floor, but fortunate survived as a fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.