सायको किलर: प्रथम बलात्कार, नंतर गुप्तांगांवर हल्ला अन् शेवट वेदनादायक मृत्यूने
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 08:48 PM2022-04-17T20:48:50+5:302022-04-17T20:49:24+5:30
Psycho Killer : पोलिसांनी सांगितले की, आरोपी 18 ते 25 वयोगटातील मुलींना आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा. त्याचे मन भरले की त्यांना मारून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचा.
ग्वाल्हेर : मुलींना आपल्या वासनेचा बळी बनवून त्यांची हत्या करणाऱ्या एका नराधम सीरियल किलरला जयपूर पोलिसांनीअटक केली आहे. या आरोपीने ग्वाल्हेरमध्ये एका मुलीच्या हत्येचीही कबुली दिली आहे. त्यानंतर ग्वाल्हेर पोलीस जयपूरला रवाना झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी 18 ते 25 वयोगटातील मुलींना आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा. त्याचे मन भरले की त्यांना मारून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचा.
ग्वाल्हेरची मुलगी मारली गेली
या विक्षिप्त आरोपीने राजस्थान पोलिसांनी तीन मुलींची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यापैकी एक ग्वाल्हेरची मुलगी आहे. मंदिरातून बेपत्ता झालेल्या मुलीची ओळख पटल्यानंतर गोलाची हत्या केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. ग्वाल्हेरच्या गोला का मंदिर परिसरातून पूजा शर्मा ही २४ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता झाली होती. ती तिच्या भावासोबत गोला का मंदिरात नातेवाईकांकडे राहायला आली होती. यादरम्यान ती बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर सापडली नाही. अखेर कुटुंबीयांनी ४ एप्रिल रोजी गोला का मंदिर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस तिचा शोध घेत होते, मात्र सुगावा लागत नव्हता.
राजस्थानमधून आरोपीला अटक
आता राजस्थान पोलिसांनी सायको किलर मिंटू उर्फ विक्रांतला पकडले आहे. त्याने तीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर बलात्कार केल्याची कबुली दिली होती. ज्यामध्ये एक मुलगी ग्वाल्हेरची रहिवासी आहे. राजस्थान पोलिसांनी ग्वाल्हेर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला बेपत्ता विद्यार्थिनीचा फोटो दाखवला तेव्हा त्याने तो फोटो पूजा शर्माचा असल्याचे सांगून तिची हत्या झाल्याचे सांगितले. जयपूर पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर ग्वाल्हेर पोलिस सायको किलरची चौकशी करण्यासाठी रवाना झाले आहेत.