पब्जीने घेतला विद्यार्थ्याचा बळी, गळफास लावून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 03:43 PM2020-07-09T15:43:06+5:302020-07-09T15:46:20+5:30

पुण्यात हॉटेल मॅनेजमेंट शिकायचा हा विद्यार्थी 

PUBG took the victim of the student, committed suicide by hanging | पब्जीने घेतला विद्यार्थ्याचा बळी, गळफास लावून केली आत्महत्या

पब्जीने घेतला विद्यार्थ्याचा बळी, गळफास लावून केली आत्महत्या

Next
ठळक मुद्देरितिक किशोर ढेंगे (वय १९) असे त्याचे नाव असून तो अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुना फुटाळा कॉर्पोरेशन लाईन जवळ राहत होता.रितीकचे वडील एका शिक्षण संस्थेत सेवारत असून आई गृहिणी आहे. रितीकला एक लहान भाऊ आहे. तो पुण्याच्या एका कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला शिकत होता.

नागपूर : पब्जीच्या आहारी गेलेल्या एका विद्यार्थ्याने अखेर गळफास लावून आत्महत्या केली. रितिक किशोर ढेंगे (वय १९) असे त्याचे नाव असून तो अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुना फुटाळा कॉर्पोरेशन लाईन जवळ राहत होता.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितीकचे वडील एका शिक्षण संस्थेत सेवारत असून आई गृहिणी आहे. रितीकला एक लहान भाऊ आहे. तो पुण्याच्या एका कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला शिकत होता. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर तो नागपुरात आपल्या घरी परतला. त्यानंतर तो रात्रंदिवस मोबाईलमध्ये व्यस्त राहायचा. कुटुंबातील सदस्यांनी लक्ष घातले असता तो सारखा पब्जी गेम खेळत असल्याचे त्यांना कळले. वडिलांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नव्हता. तो पबजीच्या एवढा आहारी गेला होता की खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करून तो रात्रंदिवस पब्जीच खेळत राहायचा. त्यामुळे त्याला भयंकर डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता. पब्जी खेळला नाही तर तो असामान्य वागायचा आणि पब्जी खेळत असला कि त्याचे डोके दुखायचे. त्याच्या या समस्येमुळे ढेंगे कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. नातेवाइकांचा सल्ला घेतल्यानंतर रितिकचे वडील किशोर ढगे यांनी त्याचा उपचार एका डॉक्टरांकडे सुरू केला. मात्र तो दाद देत नव्हता. उपचार घेत असतानाही तो मोबाईलवर व्यस्त असायचा. या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास रितीकने घरात गळफास लावून घेतला. घरच्यांना ते दिसल्यानंतर त्यांनी लगेच त्याला खाली उतरवले आणि उपचाराकरिता खासगी इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी रितीकला तपासून मृत घोषित केले.

मिळालेल्या सूचनेवरून अंबाझरीचे ठाणेदार विजयी करे यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांना त्याच्या घरी पाठविले. रितीकच्या घराची तपासणी करण्यात आली. मात्र त्याच्याकडे मोबाईल व्यतिरिक्त काहीही आढळले नाही. त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहून ठेवली नाही, असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपीका कोडापे यांनी सांगितले. परितीकचे वडील किशोर मनोहर ढेंगे यांनी पोलिसांना माहिती देताना रितिकला पब्जीचा नाद होता आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

 कुटुंबीयांना मानसिक धक्का रितीक हा अतिशय हुशार विद्यार्थी होता.  पुण्याला शिकायला जाण्यापूर्वी  त्याला  कसलाही नाद नव्हता. मात्र  पुण्याहून परतल्यानंतर  तो रात्रंदिवस  पब्जी खेळत राहायचा आणि त्याच मुळे  त्याला जीव गमवावा लागला. त्याच्या आत्मघाती पावलामुळे रितिकचे आई-वडील आणि छोट्या भावाला  जोरदार मानसिक धक्का बसला असून  परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

 

Web Title: PUBG took the victim of the student, committed suicide by hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.