डाळ, भाजी अन् ८ पोळ्या! जेलमध्ये नाही भरत पोट; हायप्रोटीन डाएटसाठी कोर्टात अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 08:21 PM2021-06-08T20:21:33+5:302021-06-08T20:22:22+5:30
Sushil Kumar : हायप्रोटीन डाएट आणि आहारातील पूरक पदार्थांची मागणी केली गेली. यावर उद्या (बुधवारी) न्यायालय आदेश देईल.
नवी दिल्ली : सागर हत्या प्रकरणातील आरोपी कुस्तीपटू सुशील कुमार याला तुरूंगातील अन्नाची कमतरता भासू लागली आहे. यासंदर्भात त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर सुनावणी झाल्यानंतर दिल्लीच्या कोर्टाने आपला आदेश राखून ठेवला आहे. हायप्रोटीन डाएट आणि आहारातील पूरक पदार्थांची मागणी केली गेली. यावर उद्या (बुधवारी) न्यायालय आदेश देईल.
मंडोली कारागृहात सुशील कुमार मिळणाऱ्या अन्नामुळे चिंतीत आहे. कुस्तीपटू सुशील कुमारचे पोट तुरूंगात मिळणाऱ्या अन्नातून भरले जात नाही. तुरूंगात त्याला आठ रोट्या, दोन कप चहा आणि चार बिस्किटे तसेच काही डाळी व भाजीपाला मिळतो. पण सुशील स्वत: साठी हेअन्न कमी असल्याचे सांगत आहे.
डॉ. स्वप्ना पाटकर यांना वांद्रे पोलिसांनी केली अटक; बोगस पदवी प्रकरणात गुन्हा दाखल https://t.co/fQFZEcPmMd
— Lokmat (@MiLOKMAT) June 8, 2021
कुस्तीपटू सुशील म्हणतो की, त्याचे पोट इतर कैद्यांचा या आहाराने भरत नाही. अधिक खाण्याबरोबर हायप्रोटीन डाएटची आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी कारागृह प्रशासनाला आवाहनही केले. हायप्रोटीन अन्नाची मागणी करण्याबाबत तो न्यायालयात दाद मागत आहे. तसेच तुरुंगात लॉरेन्स बिश्नोई हा आपल्यावर हल्ला करू शकतो आणि आपल्या जीवाला धोका आहे, असे सुशील कुमारने यापूर्वी सांगितले होते. त्यामुळेच सुशील कुमारने तुरुंगातील जेवणही सोडले होते. सुशील कुमार यावेळी चांगलाच घाबरलेला पाहायला मिळाला होता. मात्र, आता तुरुंगातील लॉरेन्स बिश्नोईबाबत एक बातमी पुढे आली आहे. सुशील कुमारला मंडोली येथील तुरुंगात ठेवले होते आणि तिथेच लॉरेन्स बिश्नोईला ठेवण्यात आले होते. पण सुशील कुमारला त्याच्यापासून धोका आहे, हे समजले होते. त्यामुळे आता लॉरेन्स बिश्नोईला तिहार तुरुंगातील पहिल्या क्रमांकाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. या पहिल्या कोठडीत सर्वाधिक सुरक्षा दिली जाते.
साहेब माझं लग्न लावून द्या! महिला पोलिसाने वरिष्ठांकडे पोहोचताच पोलीस अधिकाऱ्याचे बदलले सूरhttps://t.co/Vfxpov4Hm3
— Lokmat (@MiLOKMAT) June 8, 2021