नाशिकमध्ये मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा धारधार शस्त्राने भोसकून खून

By अझहर शेख | Published: April 30, 2023 05:05 AM2023-04-30T05:05:36+5:302023-04-30T05:07:27+5:30

तीन दिवसांत खुनाची दुसरी घटना

Puncture shop owner stabbed to death with sharp weapon by drunk assailants in Nashik | नाशिकमध्ये मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा धारधार शस्त्राने भोसकून खून

नाशिकमध्ये मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा धारधार शस्त्राने भोसकून खून

googlenewsNext

पंचवटी - छत्रपती संभाजीनगर महामार्गापासून टाकळीगावाकडे जाणाऱ्या तपोवन-जेजुरकर मळा रस्त्यावर तिघा मद्यपींनी कुरापत काढून पंक्चर दुकानदाराला त्याच्या दुकानात भोसकून ठार मारल्याची घटना घडली. नाशिक शहरात तीन दिवसांत ही खुनाची दुसरी घटना आहे. 

आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवन जेजुरकर मळा हा रिंगरोडवर रात्री निर्जन असतो. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अज्ञात तिघा हल्लेखोरांनी काहीतरी कारणावरून कुरापत काढून पंक्चर दुकानदाराच्या छातीत धारधार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी (दि.29) रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात  मूळ बिहारचा रहिवासी असलेला गुलाम रब्बानी (25) याचा मृत्यू झाला. पंक्चर दुकानदाराचा खून केल्यानंतर संशयित हल्लेखोर फरार झाले होते; मात्र त्यातील एका संशयिताला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

तपोवन शिवारातील हॉटेल मिरची ते टाकळीरोडकडे जाणाऱ्या जेजुरकर लॉन्स ते रिंगरोडवर साई मोटार गॅरेज अआहे. यागॅरेज बाहेर गुलाम नामक युवकाचे पंक्चर दुकान आहे. शनिवारी रात्री अज्ञात तीन ते चार हल्लेखोरांनी  कुरापत काढून गुलाम याच्या छातीवर धारदार
शस्त्राने वार केले. सदर घटनेनंतर जखमी झालेला गुलाम गॅरेजला लागून असलेल्या खोलीकडे रक्तबंबाळ अवस्थेत पळताना जमिनीवर कोसळला त्याला लागलीच उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

सदर घटना घडल्यानंतर आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख, गुन्हे शाखेचे विजय ढमाळ, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, संतोष शिंदे, सुरेश नरवडे, राहुल लभडे, कुंदन राठोड शिवाजी आव्हाड, भास्कर वाढवणे, आदिंसह पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. याठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा नाशिक हादरून गेले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान आडगाव गुन्हे शोध पथक गुन्हे शाखा युनिट वन मध्यवर्ती गुन्हे शाखा अशी विविध पदके हल्लेखोर यांच्या मागावर असून सर्वच पोलीस ठाण्यात नाकाबंदीचे आदेश नियंत्रण कक्षातून देण्यात आले आहे

Web Title: Puncture shop owner stabbed to death with sharp weapon by drunk assailants in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.