Pune Accident: लोणावळा: कार-कंटेनरचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 09:42 AM2022-01-30T09:42:40+5:302022-01-30T09:42:58+5:30

Mumbai-Pune Old National Highway Accident: अपघातामुळे मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

Pune Accident: Lonavla: Car-container horrific accident on Mumbai-Pune Old National Highway; Five died on the spot | Pune Accident: लोणावळा: कार-कंटेनरचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू 

Pune Accident: लोणावळा: कार-कंटेनरचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू 

googlenewsNext

लोणावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज सकाळी कार व कंटेनर यांच्या भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

   मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. कार्ला फाटा सोडल्यानंतर  रस्त्याच्या मध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरखाली ही कार घुसली. या भीषण अपघातात कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 

अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर खाली अडकलेली गाडी व प्रवासी यांना बाहेर काढले. दरम्यान या घटनेमुळे मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
 

Web Title: Pune Accident: Lonavla: Car-container horrific accident on Mumbai-Pune Old National Highway; Five died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात