Pune Accident: पुणे: शिवभक्तांच्या टेम्पोला कंटेनरची धडक; ३० ते ३५ शिवभक्त जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 09:46 AM2023-03-10T09:46:23+5:302023-03-10T09:46:36+5:30

पुण्यामध्ये सकाळच्या सुमारास शिवभक्तांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ३० ते ३५ शिवभक्त जखमी झाले आहेत. यापैकी १० ...

Pune Accident: Pune: A container collided with a Shiva devotee's tempo; 30 to 35 Shiv devotees injured | Pune Accident: पुणे: शिवभक्तांच्या टेम्पोला कंटेनरची धडक; ३० ते ३५ शिवभक्त जखमी 

Pune Accident: पुणे: शिवभक्तांच्या टेम्पोला कंटेनरची धडक; ३० ते ३५ शिवभक्त जखमी 

googlenewsNext

पुण्यामध्ये सकाळच्या सुमारास शिवभक्तांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ३० ते ३५ शिवभक्त जखमी झाले आहेत. यापैकी १० जणांना गंभीर दुखापती झाल्याचे सांगितले जात आहे. तर अन्य वीज जणांना किरकोळ मार लागला आहे. बंगळुरु-मुंबई बायपासजवळ हा अपघात झाला आहे. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन हे शिवभक्त एका टेम्पोने लोणावळ्यातील शिलाटणे येथे जात होते. यावेळी टेम्पो बंगळूरू -मुंबई बायपासजवळ आल्यावर मागून येणाऱ्या कंटेनरने त्यांना धडक दिली. ताथवडेमध्ये हा अपघात झाला आहे. 

या टेम्पोची एका मोटारसायकललाही धडक बसली आहे. यामध्ये मोटारसायकलस्वारही जखमी झाला आहे. पवना हॅास्पिटल मधे १७ जण, पायोनियर मधे ७-८ जण व रावेत ला ३-४ जण एडमीट केलेले आहेत सर्व जन शिलाटणे गावचे आहेत.

Web Title: Pune Accident: Pune: A container collided with a Shiva devotee's tempo; 30 to 35 Shiv devotees injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात