पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट; ‘इसिस’ला सीरियातून सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 07:41 AM2023-11-08T07:41:55+5:302023-11-08T07:45:08+5:30

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ताब्यात घेतलेला दहशतवादी मोहम्मद शाहनवाज आलम याने ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान ही माहिती दिली. 

Pune Chain Bomb Plot; Instructions to ISIS from Syria | पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट; ‘इसिस’ला सीरियातून सूचना

पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट; ‘इसिस’ला सीरियातून सूचना

पुणे : दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या इस्लामिक स्टेट अर्थात ‘इसिस’च्या महाराष्ट्र गटाकडून पुण्यात साखळी बाॅम्बस्फोट घडविण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता. ‘इसिस’च्या महाराष्ट्र गटातील दहशतवाद्यांना सीरियातून सूचना मिळाल्या होत्या, ही धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ताब्यात घेतलेला दहशतवादी मोहम्मद शाहनवाज आलम याने ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान ही माहिती दिली. 
‘एनआयए’ने सहा दिवसांपूर्वी कोंढव्यातून पसार झालेला दहशतवादी मोहम्मद शाहनवाज आलम उर्फ शफिकूर रहमान आलम (रा. हजारीबाग, झारखंड) याला नुकतीच अटक केली. आलमला एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आलमची एनआयच्या पथकाने चौकशी केली. तेव्हा पुण्यात साखळी बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. याबाबत सीरियातून सूचना मिळाल्याची माहिती त्याने एनआयएच्या अधिकाऱ्यांना दिली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात दहशतवाद्यांकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले. 

    जुलै महिन्यात पुण्यातील कोथरूड भागात दुचाकी चोरताना इम्रान खान, मोहम्मद साकी, मोहम्मद आलम यांना अटक करण्यात आली होती. 
    कोंढव्यात आरोपी साकी, खान, आलम वास्तव्यास होते. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. तपासात तिघे दहशतवादी इसिसच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते.

Web Title: Pune Chain Bomb Plot; Instructions to ISIS from Syria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.