पुणे हादरलं! ‘सबसे बडा गुंडा कौन’ या वादातून चाकूने तरुणाला भोसकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 02:30 PM2020-11-11T14:30:30+5:302020-11-11T14:32:03+5:30

तडीपार गुंडाचा सराईत गुन्हेगारांकडून खून ; आंबिल ओढ्याजवळील घटना

Pune trembled! The young man was stabbed in the argument 'Who is the biggest criminal' | पुणे हादरलं! ‘सबसे बडा गुंडा कौन’ या वादातून चाकूने तरुणाला भोसकले

पुणे हादरलं! ‘सबसे बडा गुंडा कौन’ या वादातून चाकूने तरुणाला भोसकले

Next

पुणे : दोघांची कारागृहात शिक्षा भोगत असताना ओळख झाली होती. सुरज हा कारागृहातून सुटल्यानंतरही गुन्हे करीत असल्याने पोलिसांनी त्याला तडीपार केले होते. दोघेही जण रविवारी रात्री आंबिल ओढा येथे भेटले होते.मध्यरात्री उशिरापर्यंत गप्पा मारत होते.यावेळी बोलता बोलता दोघांपैकी कोण मोठा गुन्हेगार असा वाद सुरु झाला. या वादावादीत सराईत गुन्हेगाराने तडीपार गुंडाचा चाकूने भोसकून खुन केला. ही घटना आंबील ओढ्या येथील मांंगीरबाबा चौकात सोमवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडली.

सुरज भालचंद्र यशवद (वय २३, रा. राजेंद्रनगर, नवी पेठ) असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे.त्याच्या फिर्यादीवरुन दत्तवाडी पोलिसांनी अक्षय गायकवाड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केले आहे. पोलिसांची २ पथके गायकवाडचा शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज यशवद याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात अनेक शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. अक्षय गायकवाड याच्यावरही दरोड्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. दोघांची कारागृहात शिक्षा भोगत असताना ओळख झाली होती. सुरज हा कारागृहातून सुटल्यानंतरही गुन्हे करीत असल्याने पोलिसांनी त्याला तडीपार केले होते. दोघेही जण रविवारी रात्री आंबिल ओढा येथे भेटले होते.मध्यरात्री उशिरापर्यंत गप्पा मारत होते.यावेळी बोलता बोलता दोघांपैकी कोण मोठा गुन्हेगार असा वाद सुरु झाला.

 सुरजने अक्षयला तुझे जितके वय आहे. तितके गुन्हे माझ्यावर दाखल आहेत. तू जास्त शहाणपणा करु नकोस असे म्हणत त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर अक्षय तेथून रागाने घरी निघून गेला. घरातून तो चाकू घेऊन आला व त्याने रस्त्यातच सुरजवर चाकूने सपासप वार केले. जखमी अवस्थेत सुरजला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटे सुरजचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खोमणे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Pune trembled! The young man was stabbed in the argument 'Who is the biggest criminal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.