पुणे हादरले ! आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत मुलीसोबत गैरकृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 08:50 AM2021-09-07T08:50:59+5:302021-09-07T08:53:21+5:30

चौदा वर्षांच्या मुलीवर नऊ जणांचा दोन दिवस अमानुष अत्याचार

Pune was shaken by the gang rape | पुणे हादरले ! आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत मुलीसोबत गैरकृत्य

पुणे हादरले ! आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत मुलीसोबत गैरकृत्य

Next
ठळक मुद्देआठ अटकेत; पाच रिक्षाचालक, दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेशमुलीच्या वडिलांनी दिलेल्या  तक्रारीनुसार तपास करत असताना पोलिसांनी पीडितेला चंदीगढहून ताब्यात घेतले. त्यानंतर हा भयावह प्रकार उघडकीस आला

 

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात १४ वर्षांच्या मुलीवर नऊ जणांनी अमानुषपणे सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली व पुण्यासह संपूर्ण राज्यातील समाजमन हादरून गेले. पीडित मुलगी बिहारला जाण्यासाठी रात्री पुणे रेल्वे स्टेशनवर आली होती. मात्र ट्रेन नसल्याने स्टेशनवरच फिरत असतानाच रिक्षाचालक नराधमाची नजर तिच्यावर पडली. घरी सोडण्याच्या बहाण्याने त्याने तिचे अपहरण केले. त्यानंतर मित्रांच्या मदतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या  तक्रारीनुसार तपास करत असताना पोलिसांनी पीडितेला चंदीगढहून ताब्यात घेतले. त्यानंतर हा भयावह प्रकार उघडकीस आला. पुण्यातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि खडकी परिसरातील लॉज व इतर ठिकाणी नेऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला. वानवडी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. त्यात रेल्वेचे दोन कर्मचारी, पाच रिक्षाचालक आणि अन्य आरोपींचा सहभाग आहे. तब्बल दोन दिवस हे नराधम मुलीवर अत्याचार करत होते. पहिल्या दिवशी चौघांनी, तर दुसऱ्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलगी मूळची बिहार येथील आहे. तिचे वडील वानवडीत एका ठिकाणी माळीकाम करतात. ती तिच्या आईवडिलांसोबत राहते. ३१ ऑगस्टला मुलगी तिच्या बिहार येथील मित्राला भेटायला निघाली होती. घरच्यांना माहिती न देताच ती पुणे स्टेशन परिसरात आली होती. मात्र, तो मित्र आलाच नाही. रात्री कोणतीही रेल्वे नव्हती. रात्री उशिरापर्यंत ती स्टेशन परिसरात फिरत होती. आरोपींची नजर तिच्यावर पडली. त्यांनी तिला रात्री राहण्याची सोय करतो, उद्या रेल्वेत बसवून देतो, असे सांगून डाव साधला.

आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत गैरकृत्य
nनराधम रिक्षाचालकावर विश्वास ठेवून पीडित मुलगी त्याच्याबरोबर गेली. रिक्षाचालकाने वाटेत आणखी एका रिक्षाचालकाला बरोबर घेतले. तेथून तिला एका लॉजला नेले. तेथे तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन रिक्षाचालकांनी अत्याचार केला. 
nदरम्यान, हा प्रकार कोणाला सांगितला तर, आईवडिलांना मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या लोकांच्या ताब्यात तिला दिले. दुसऱ्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर मुलगी रेल्वेने मुंबई आणि तेथून चंढीगडकडे गेली होती.

Web Title: Pune was shaken by the gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.