पुण्यात जमावाचा पोलिसांवर हल्ला, स्वरक्षणार्थ पोलिसांचा हवेत गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 12:17 AM2021-12-31T00:17:11+5:302021-12-31T00:17:51+5:30

येरवडा येथील कोते वस्ती येथे सर्व धर्म समभाव सोसायटी ही म्हाडाची इमारत आहे. येथील नागरिकांना शक्तीसिंग सुरजसिंग बावरी (वय २२) हा गुन्हेगार व त्याचे साथीदार त्रास देत होते.

pune yerwada Police in riot gear storm a rally on Friday, removing hundreds of protesters by truck | पुण्यात जमावाचा पोलिसांवर हल्ला, स्वरक्षणार्थ पोलिसांचा हवेत गोळीबार

पुण्यात जमावाचा पोलिसांवर हल्ला, स्वरक्षणार्थ पोलिसांचा हवेत गोळीबार

Next
ठळक मुद्देगोळीबाराचा आवाज ऐकल्यावर जमाव पांगला. त्यानंतर पोलिसांनी शक्तीसिंग याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते

पुणे : सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केला. यावेळी पोलिसांनी स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. ही घटना येरवडा येथील पोतेवस्ती येथे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत एक पोलीस अधिकारी व कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील कोते वस्ती येथे सर्व धर्म समभाव सोसायटी ही म्हाडाची इमारत आहे. येथील नागरिकांना शक्तीसिंग सुरजसिंग बावरी (वय २२) हा गुन्हेगार व त्याचे साथीदार त्रास देत होते. याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकाने फोन करुन याची माहिती दिली. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यातील पथक शक्तीसिंगला पकडायला तेथे गेले होते. यावेळी बावरी याने तेथील एका समाजातील लोकांना एकत्र करुन पोलिसांविरुद्ध भडकावले. त्यानंतर शक्तीसिंग याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हा जमाव चाल करुन आला. या वेळी झालेल्या गोंधळात एक पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. तेव्हा पोलिसांनी हवेत एक राऊंड फायर केला. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर जमाव पांगला. त्यानंतर पोलिसांनी शक्तीसिंग याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
 

Web Title: pune yerwada Police in riot gear storm a rally on Friday, removing hundreds of protesters by truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.