पुनीतचं इन्स्टाग्राम मनिकाने केलेलं हॅक; नातेवाईकांची पोलिसांत धाव, सांगितलं 'डर्टी सीक्रेट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:35 IST2025-01-03T16:34:56+5:302025-01-03T16:35:17+5:30

Puneet Khurana : पुनित खुराना प्रकरणात आता हळूहळू धक्कादायक खुलासे होत आहेत.

Puneet Khurana case wife manika pahwa hack his instagram account relative | पुनीतचं इन्स्टाग्राम मनिकाने केलेलं हॅक; नातेवाईकांची पोलिसांत धाव, सांगितलं 'डर्टी सीक्रेट'

पुनीतचं इन्स्टाग्राम मनिकाने केलेलं हॅक; नातेवाईकांची पोलिसांत धाव, सांगितलं 'डर्टी सीक्रेट'

पुनित खुराना आत्महत्या प्रकरणात आता हळूहळू धक्कादायक खुलासे होत आहेत. कारण नातेवाईकांनी पत्नी मनिका पाहवावर अनेक आरोप केले आहेत. पुनीतचा चुलत भाऊ ध्रुवने सांगितलं की आत्महत्येपूर्वी मनिकाने पुनीतचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक केलं होते. समोर आलेल्या ऑडिओमध्ये पुनीत त्याचं अकाउंट हॅक झाल्याचं सांगत होता असं म्हटलं आहे. 

"पुनीतचा फोन सध्या पोलिसांकडे आहे आणि त्याचं इन्स्टाग्राम अजूनही एक्टिव्ह आहे, ज्यावरून स्पष्टपणे दिसून येतं की कोणीतरी त्याच्या अकाउंटचा वापर करत आहे. मनिका माझ्या भावावर अत्याचार करायची, तिचे आणखी काही व्हिडीओ आहेत, जे मी लवकरच रिलीज करेन" असं पुनीतच्या भावाने म्हटलं आहे. अतुल सुभाषनंतर झालेल्या या घटनेने सर्वत्र पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

पुनीतच्या आणखी एका नातेवाईकाने सांगितलं की, आम्हाला असं वाटतंय की एफआयआर दाखल करण्यात अडचणी येतील. कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जातो हा मुख्य मुद्दा आहे. जगदीश पाहवा (मनिकाचे वडील) यांच्या मोठ्या मुलीचीही केस मॉडेल टाऊन पोलीस ठाण्यात सुरू आहे. तिच्या मोठ्या जावयाने सासऱ्यांवर अटेंप्ट टू मर्डर गुन्हा दाखल केला आहे. 

पुनीतने २ कोटी रुपये देऊन सासऱ्यासोबत सेटलमेंट केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यावर त्याच्या नातेवाईकाने सांगितलं की, "पुनीतच्या सासऱ्याने दोन कोटी रुपये देऊ, पण घर देणार नाही, अशी सेटलमेंट केली होती. पुनीतचे सासरे सेटलमेंटवरून नेहमीच मागे हटायचे. त्यामुळेच पुनीत खूप जास्त प्रेशरमध्ये होता. पुनीतशी शेवटचे बोलत असताना मनिका म्हणाली की, मी तुला एकही पैसा देणार नाही... मी तुला रस्त्यावर आणेन."
 

Web Title: Puneet Khurana case wife manika pahwa hack his instagram account relative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.