काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या, कॅनाडाच्या खलिस्तानी दहशतवाद्याने घेतली हल्ल्याची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 01:37 PM2023-09-19T13:37:25+5:302023-09-19T13:45:57+5:30

एक जण घरात शिरला तर दुसरा बाहेर थांबला..

Punjab Congress leader Baljinder Singh Bali shot dead Khalistan terrorist sitting in Canada took responsibility | काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या, कॅनाडाच्या खलिस्तानी दहशतवाद्याने घेतली हल्ल्याची जबाबदारी

काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या, कॅनाडाच्या खलिस्तानी दहशतवाद्याने घेतली हल्ल्याची जबाबदारी

googlenewsNext

Congress leader shot dead: पंजाबमधील काँग्रेस पक्षाशी संबंधित एका स्थानिक राजकारण्याची मोगा जिल्ह्यातील डाला गावात खलिस्तान कट्टरतावादी संघटनेशी संबंधित असलेल्या दहशतवाद्याने गोळ्या घालून हत्या केली. ४५ वर्षीय बलजिंदर सिंग बल्ली (Baljinder Singh Bali) असे मृत राजकारण्याचे नाव आहे. सोमवारी काही हल्लेखोर त्याच्या घरात घुसले, तेव्हा त्याच्यावर दोन वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. एक गोळी त्याच्या छातीत तर दुसरी मांडीला लागली. हल्लेखोर दुचाकीवरून आल्याचे पोलिसांनी सांगितले. एक जण घरात शिरला तर दुसरा बाहेर थांबला. डाला गावातील बल्ली यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या CCTV मध्ये ही घटना कैद झाली आहे. अजितगडमध्ये ते काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष होते.

दहशतवादी अर्श डल्लाने घेतली जबाबदारी

गुन्ह्याच्या काही तासांनंतर, एक गुंड आणि कुख्यात दहशतवादी अर्शदीप सिंग गिल उर्फ ​​अर्श डल्ला याने त्याच्या खात्यावरील फेसबुक पोस्टमध्ये हत्येची जबाबदारी स्वीकारली. तो सध्या कॅनडात कायमचा रहिवासी आहे. आपल्या आईला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आणि त्याच्या मित्रांना अटक केल्याचा बदला घेण्यासाठी त्याने बल्लीची हत्या केल्याचे त्याने सांगितले.

डल्ला म्हणाला, "डाला गावातील बल्लीच्या हत्येला मी जबाबदार आहे कारण माझ्या गावातील राजकारणामुळेच मला या मार्गावर जावे लागले. हा माणूस (बल्ली) माझ्या आईला एक आठवडा CIA (तुरूंगवास भोगायला लावण्यास जबाबदार होता आणि त्याच्यामुळे माझ्या मित्रांनाही अटक केली. त्याचे पोलिसांशी संगनमत होते. त्याने माझ्या घराची तोडफोड केली. त्याने स्वत:चे महत्त्व वाढवण्यासाठी माझे घर उद्ध्वस्त केले. माझ्या आयुष्याचा उद्देश माझे जीवन जगणे नव्हते तर याला मारणे हे होते. हवे असते तर त्याच्या मुलालाही मारता आले असते, पण त्या मुलाचा काही दोष नव्हता. त्याच्याबद्दल सहानुभूती बाळगणे मी माणुसकी समजतो."

दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला असून एफआयआर दाखल करण्यात येत आहे. मोगाचे एसएसपी जे एलानचेजियन म्हणाले की, डल्लाच्या कथित फेसबुक पोस्टची चौकशी केली जात आहे.

 

 

Web Title: Punjab Congress leader Baljinder Singh Bali shot dead Khalistan terrorist sitting in Canada took responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.