बोंबला! बहिणीने सख्ख्या भावासोबत केलं लग्न, कारण वाचून सगळेच झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 05:38 PM2021-06-03T17:38:22+5:302021-06-03T17:40:18+5:30

या प्रकरणात भाऊ-बहिणीचे घरवाले देखील सामिल होते. पंजाब एका गावातील तरूणीला परदेशातून जाऊन रहायचं होतं, पण तिला व्हिसा मिळण्यास अडचण येत होती.

Punjab : Indian brother and sister married to get visa for Australia | बोंबला! बहिणीने सख्ख्या भावासोबत केलं लग्न, कारण वाचून सगळेच झाले हैराण

बोंबला! बहिणीने सख्ख्या भावासोबत केलं लग्न, कारण वाचून सगळेच झाले हैराण

googlenewsNext

पंजाबमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने आपल्या सख्ख्या भावासोबत लग्न केलं. कारण तिला ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट व्हायचं होतं. लग्नानंतर तिने फेक पासपोर्ट बनवला आणि ऑस्ट्रेलियाला गेली. याची तक्रार एका महिलेने पोलिसात केल्यावर या घटनेचा खुलासा झाला. या प्रकरणात भाऊ-बहिणीचे घरवाले देखील सामिल होते. पंजाब एका गावातील तरूणीला परदेशातून जाऊन रहायचं होतं, पण तिला व्हिसा मिळण्यास अडचण येत होती.

sbs सोबत बोलताना पोलीस अधिकारी जय सिंह म्हणाले की, 'तपासानुसार आम्हाला अशी माहिती मिळाली की, तरूणीचा भाऊ ऑस्ट्रेलियात स्थायी नागरिक आहे आणि त्याच्या बहिणीने खोटी कागदपत्रे तयार केली. मॅरेज सर्टिफिकेट गुरूद्वारातून तयार करून घेतलं आणि ऑफिसमधून परवानगी घेतली'. (हे पण वाचा : हॉटेलच्या रूममधून येत होता पत्नीचा आवाज, पतीने तिला बोलवलं तर उघड झालं तिचं सत्य....)

पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, 'त्यांनी सामाजिक व्यवस्था, कायदे व्यवस्था आणि धार्मिक व्यवस्थेसोबत खोटेपणा केला आहे. जेणेकरून देशातून बाहेर जाता यावं. आम्ही रेड टाकत आहोत. पण ते पळत आहेत. सध्या कुणालाच ताब्यात घेण्यात आलेलं नाही'. (हे पण वाचा : धक्कादायक! सूनेची डोकेदुखी दूर करण्यासाठी घरी तांत्रिकांना बोलवलं, त्यानंतर जे झालं ते वाचून व्हाल हैराण....)

खोटी कागदपत्रे तयार करून तरूणी आपल्या भावासोबत ऑस्ट्रेलियाला पळून गेली. तिचा भाऊ ऑस्ट्रेलियात नोकरी करतो. पोलिसांनुसार, हा फसवणुकीचा गंभीर गुन्हा आहे. ज्यात संपूर्ण परिवाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेची चौकशी करत आहेत. जय सिंह म्हणाले की, परदेशात जाण्यासाठी लोक अनेक प्रकारे फसवणूक करतात. मात्र, परदेशात जाण्यासाठी सख्ख्या भावासोबत लग्न केल्याची ही पहिलीच घटना ऐकली आहे. ही घटना ऐकल्यावर आम्ही हैराण झालो.
 

Web Title: Punjab : Indian brother and sister married to get visa for Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.