अक्षय कुमारवर वादग्रस्त १०० कोटींच्या व्यवहारासंबंधी पंजाब एसआयटीने केला प्रश्नांचा भडीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 03:49 PM2018-11-21T15:49:11+5:302018-11-21T15:51:59+5:30
राम रहीमची ओळख कशी झाली? कुठे झाली? असे प्रश्न त्याला विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, राम रहीमला आपण कधीही भेटलो नाही असं अक्षयनं ठामपणे सांगितलं. या प्रकरणात मला विनाकारण गोवण्यात आल्याचे अक्षयने सांगितले. महत्वाचे म्हणजे 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख बाबा राम रहीम सिंग आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यात झालेल्या १०० कोटीच्या व्यवहारासंबंधी अक्षयला अनेक प्रश्न विचारण्यात आले.
चंदीगड - शीख धर्मातील पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केल्याप्रकरणी पंजाब विशेष तपास पथकाने (एसआयटी) अभिनेता अक्षय कुमार याची आज दोन तास कसून चौकशी केली. या चौकशीत अक्षय कुमारला ४२ प्रश्न विचारले. अक्षयने या प्रश्नांची उत्तरे देताना त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अधिकाऱ्यांनी अक्षयला राम रहीमच्या भेटीबद्दल अनेक प्रश्न विचारले. राम रहीमची ओळख कशी झाली? कुठे झाली? असे प्रश्न त्याला विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, राम रहीमला आपण कधीही भेटलो नाही असं अक्षयनं ठामपणे सांगितलं. या प्रकरणात मला विनाकारण गोवण्यात आल्याचे अक्षयने सांगितले. महत्वाचे म्हणजे 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख बाबा राम रहीम सिंग आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यात झालेल्या १०० कोटीच्या व्यवहारासंबंधी अक्षयला अनेक प्रश्न विचारण्यात आले.
'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख बाबा राम रहीम सिंगचा 'मेसेंजर ऑफ गॉड' नावाचा एक चित्रपट सप्टेंबर २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात राम रहीमची निर्दोष सुटका झाली होती. मात्र, पंजाबमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. तो विरोध डावलून चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय राम रहीम आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्या बैठकीत झाला होता. ही बैठक अक्षयकुमारच्या घरी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळं अक्षय कुमार अडचणीत सापडला होता. धर्मग्रंथाचा अवमान केल्याप्रकरणी अक्षय कुमार, राम रहीम आणि सुखबीर सिंग बादल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात सुखबीर सिंग बादल आणि अक्षय कुमार या दोघांना एसआयटीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार आज अक्षय एसआयटीसमोर हजर झाला.
Bollywood actor Akshay Kumar appears before Special Investigation Team amid Bargari sacrilege case
— ANI Digital (@ani_digital) November 21, 2018
Read @ANI Story | https://t.co/nMI0U8btKRpic.twitter.com/CxKh3FTE21