मुसेवाला हत्याकांडात मानलेली बहिण अफसाना खान संशयाच्या भोवऱ्यात; NIA कडून ५ तास चौकशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 09:55 PM2022-10-25T21:55:08+5:302022-10-25T21:56:48+5:30

पंजाब गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे.

punjabi singer afsana khan summoned in criminal gangster terror case sidhu moose wala | मुसेवाला हत्याकांडात मानलेली बहिण अफसाना खान संशयाच्या भोवऱ्यात; NIA कडून ५ तास चौकशी!

मुसेवाला हत्याकांडात मानलेली बहिण अफसाना खान संशयाच्या भोवऱ्यात; NIA कडून ५ तास चौकशी!

googlenewsNext

नवी दिल्ली-

पंजाब गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) प्रसिद्ध पंजाबी प्ले-बॅक सिंगर अफसाना खान हिला गँगस्टर-टेररिस्ट सिंडिकेट केसप्रकरणात समन्स धाडले. या प्रकरणात एनआयएनं मंगळवारी अफसाना खान हिची ५ तास चौकशी केली. अफसाना ही गायक मुसेवालाच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक होती. ती मुसेवाला याला आपला भाऊ मानत होती. 

सुत्रांच्या माहितीनुसार अफसाना हिच्याकडून एनआयएच्या अधिकाऱ्यांनी मुसेवाला केसमध्ये सहभागी असलेल्या गँगस्टर कनेक्शनबाबत माहिती मिळवली आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडात अफसाना खान हिचाही सहभाग असल्याचा एनआयएला संशय आहे. नुकतंच गँगस्टर्सवर एनआयएनं टाकलेल्या दुसऱ्या धाडीत अफसाना खान हिचं नाव तपास संस्थेच्या रडारवर आलं होतं. 

बंबीहा गँग आणि लॉरेन्स बिश्नोई गँगचं शत्रुत्व आहे. बिश्नोई गँगवर सिंगर सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा आरोप आहे. एनआयएनं या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्याच्या हेतूनं दोनवेळा छापेमारी देखील केली होती. 

मुसेवालाची झाली होती हत्या
सिद्धू मुसेवाला याच्यावर २९ मे रोजी गोळीबार करुन त्याची हत्या करण्यात आली होती. अवघ्या २८ वर्षीय मुसेवालानं जगाचा निरोप घेतला आणि या हत्याकांडाची संपूर्ण देशभर चर्चा झाली. हल्लेखोरांनी एके-४७, एके-९४ सह इतर घातक शस्त्रांसह मुसेवाला याच्यावर ३० राऊंड फायर केले होते. या हत्याकांडाची जबाबदारी गँग लीडर लॉरेन्स बिश्नोईचे जवळचा सहकारी गँगस्टर गोल्डी ब्रार याने घेतली होती. गोल्डी ब्रार कॅनडामधून भारतात अशा हिंसक कारवाया हाताळतो. 

सिद्धू मुसेवाला आपल्या करिअरच्या अगदी शिखरावर होता. त्याची तगडी फॅनफॉलोइंग होती. एका यशस्वी गायकावर अवघ्या वयाच्या २८ व्या वर्षी दिवसाढवळ्या गोळीबार होऊ शकतो असा कुणीच विचार केला नव्हता. मूसेवाला हत्याकांडाला आता बरेच महिने उलटून गेले असले तरी त्याला अद्याप न्याय मिळालेला नाही. आरोपींना तातडीनं पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मुसेवाला कुटुंबीय आणि त्याचे चाहते करत आहेत. 

Web Title: punjabi singer afsana khan summoned in criminal gangster terror case sidhu moose wala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.