Sidhu Moose Wala : ३० राऊंड फायरिंग केल्यावर अशी झाली होती सिद्धू मूसेवालाच्या थारची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:17 PM2022-05-30T12:17:31+5:302022-05-30T12:25:10+5:30
Sidhu Moose Wala : घरापासून काही अंतरावरच सिद्धू मूसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शूटआउटचे पुरावे तेथील भींतींवर दिसत आहे.
(Image Credit : Aajtak)
पंजाबच्या मानसा जिल्ह्यात रविवारी प्रसिद्ध पंजाबी गायब सिद्धू मूसेवालाची (Sidhu Moose Wala Murder) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना जवाहरके गावाजवळ घडली. हल्लेखोरांनी एके-४७, एके-९४ सहीत इतरही काही शस्त्रांनी कारमध्ये असलेल्या मूसेवालावर ३० गोळ्या झाडल्या. ज्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मूसेवालासोबत गाडीत असणारे दोन जण जखमी झाले आहेत.
घरापासून काही अंतरावरच सिद्धू मूसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शूटआउटचे पुरावे तेथील भींतींवर दिसत आहे. सिद्धू मूसेवाला आणि त्याच्या मित्रांवर गोळीबार केला तेव्हा काही गोळ्या तेथील भींतींमध्ये जाऊन फसल्या आहेत.
एक प्रत्यक्षदर्शीने आजतकला सांगितलं की, गायक सिद्धूसोबत गाडीत आणखी दोन लोक बसले होते. सिद्धूच्या शरीरात गोळ्या होत्या आणि मी पाहिलं तेव्हा त्याचा श्वास सुरू होता. मी सिद्धूला गाडीतून बाहेर आणि दुसऱ्या गाडीत टाकून हॉस्पिटलसाठी रवाना केलं.
प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, हल्लेखोरांनी ३५ ते ४० राउंड फायरिंग केली. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, सिद्धू मूसेवालावर AN - 94 सारख्या ती अत्याधुनिक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. या हत्याकाडांची जबाबदारी गॅंग लीडर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा माणूस कॅनडातील गॅंगस्टर गोल्डी बराडने घेतली आहे.